रत्नागिरी जिल्हा नाभिक समाजाकडून रायगड जिल्हा अध्यक्ष सुदाम शिंदे यांचा सत्कार.

 
रत्नागिरी , प्रतिनिधी

रत्नागिरी : दि. ८ -  स्व. दिनाभाई माेरे यांनी स्थापन केलेल्या रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाची अध्यक्ष पदाची व कार्यकारिणी ची निवडणुक काेलाड येथील नाभिक समाज सभाग्रुहात दि.१७ आँगस्ट राेजी पार पडली.  या निवडणुकीत महाड तालुका साकडी गांवचे सुपुत्र व सद्यस्थित गाेरेगांव (माणगांव) सुदाम बाबु शिंदे विजयी झाले. शासकीय सेवेत असुनही समाजाबद्दल असलेले प्रेम , सामाजिक कार्याची आवड
 आणि प्रत्येक क्षेत्रातील समाजबांधवापर्यंत असलेला जनसंपर्क यामुळे जिल्ह्याने अध्यक्षपदाच्या विजयाची धुरा सुदाम शिंदे यांच्या खांद्यावर साेपाविली गेली.

रत्नागिरी जिल्हा नाभिक समाजाच्या वतीने रायगड जिल्हा नाभिक समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष  सुदामजी शिंदे  यांचा सत्कार सोमवार दिनांक ०७/०९/२०२० रोजी करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा नाभिक समाजाचे कार्याध्यक्ष महादेव चव्हाण, रायगड जिल्हा विश्वस्त मारुती रा.शिर्के गुरुजी,  यशवंतराव खराडे आण्णा , माणगांव तालुका अध्यक्ष  सुरेंद्र पालांडे, विलास यादव उपाध्यक्ष रा. कॉ पार्टी गोरेगांव विभाग,
 बिरवाडी ( महाड ) विभागिय अध्यक्ष बबन सकपाळ याचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

सध्या नाभिक समाजासमाेर असंख्य असे सामाजिक प्रश्न आहेत. त्यातच सलुन व्यवसायिक समाजबांधव अडचणीत आहेत. त्यांना सावरणे व राज्यपातळीवर समाजाच्या समस्या शासन दरबारी पाेहचविणे ही कल्पकता सुदाम शिंदे यांच्या 
अंगी बाणली आहे. मागील पाच वर्षात समाजाच्या जिल्हा कार्यकारिणीवर शिंदे
 यांनी जिल्हासचिव पदावर काम केल्यामुळे नाभिक समाजाच्या तळागाळातील घटकाची जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच नाभिक 
समाजाचे प्रश्न मार्गी लागतील. असा विश्वास या कार्यक्रमानिम्मित व्यक्त करण्यात आला.  यावेळी रत्नागिरी जिल्हा नाभिक समाजाचे कार्यकर्ते व महिला वर्ग
 उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या