चिंचवड - प्रतिनिधी
सचिन जगताप
कोरोना च्या कालावधीत सर्वसाधारण नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते ह्या अडचणी सोडवण्याचे त्यांना एकच आशादायी ठिकाण मिळाले ते म्हणजे चिंचवड पोलीस स्टेशन, कारण चिंचवड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे एल आय बी चे दत्तात्रय कांबळे एएसआय संतोष पावडे पोलीस नाईक विठ्ठल मदने पोलीस शिपाई यांच्या कर्तव्यदक्ष व माणुसकीच्या भावनेने चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिक अत्यंत समाधान पूर्वक चिंचवडच्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे त्यांचे आभार व्यक्त करीत होते.
यामध्ये जिल्हाअंतर्गत बंदी असलेल्या ई -पासची सविस्तर माहिती सांगणे
बाहेर राज्यातील कामगार विद्यार्थी यांची संपूर्ण जबाबदारीने सर्व सोयीयुक्त रवानगी करणे
कोरोणाच्या महामारीचे गांभीर्य ओळखून नागरिकांमध्ये जनजागृती करणे
गरजू व्यक्तींपर्यंत अन्न वाटप तसेच जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले.
चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीतील अधिकारी व कर्मचारी अनेकदा कोरोनामुळे quarantaen सुद्धा झालेत
परंतु कुठेही न थांबता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांना खूप छान व समाधानकारक सहकार्य केले सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे नागरिकांप्रति असलेली सहकार्याची भावना लक्षात घेता प्रांत पोलीस मित्र संघाने सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांचा कोरणा योद्धा या सन्मानाने गौरव करण्यात आला अशी माहिती प्रांत पोलीस मित्र संघाचे अध्यक्ष गोपाल बिरारी यांनी दिली
तसेच समाजातील काही सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी आपली जीवाची पर्वा न करता समाजासाठी व पोलीस प्रशासनासाठी मदत करताना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली अशा सामाजिक कार्यकर्त्यांनाही कोरणा योद्धा या सन्मानाने गौरवण्यात आले वरील कार्यक्रमासाठी प्रांत पोलीस मित्र संघाचे अध्यक्ष गोपाल बिरारी मध्यवर्ती शांतता कमिटी चे सदस्य सुभाष मालुसरे संदीप पोलकम दत्ता अवससरकर टाटा मोटर चे वरिष्ठ व्यवस्थापक सतीजी मोटे पोलीस प्रवाह चे संपादक नवनाथ कापले प्रशांत कुलकर्णी किशोर शिंदे सुशील मालुसरे दत्तात्रय देवकर सायकर
इत्यादी मान्यवर उपस्थित होते




0 टिप्पण्या