महाराष्ट्र राज्यात निर्माण झालेल्या कोविड 19 च्या प्रादुर्भावाने गेली सहा महिने लॉकडाऊन परिस्थिती आहे. त्यानंतर 3 जून 2020 रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये रायगड जिल्हा परिसरात खूप नुकसान झाले आहे. गेली सहा महिने सर्व व्यवसाय बंद आहेत. नाभिक समाज हातावर पोट असणारा समाज आहे. लॉकडाऊनमुळे धंदा करता आला नसल्याने उपासमारीची वेळ असताना वीज मंडळाने अवाढव्य वीजबिल आकारली आहेत. सर्व समाजाच्या आवाक्याच्या बाहेर असल्याने बहुजनसमाजावर एक वीज बिलाचे संकटच आहे. त्यामुळे वीज बिलात सूट देण्याचे शासनाचे धोरण आहे. महावितरण कार्यालयात ग्राहकांना योग्य न्याय मिळत नाही. अशिक्षित गरीब लोक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीने दिलेले सरसकट विजबिल कमी करून ग्राहकांना दिलासा द्यावा. अशी मागणी रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाकडून करण्यात आली आहे. महावितरण कंपनिच्या मुख्य आभियंता आधिकाऱ्यांनी शासनाच्या येणाऱ्या नियमावलिला अनुसरुन योग्य दखल घेतली जाईल असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले.



0 टिप्पण्या