गिरीश गोरेगावकर , प्रतिनिधी
गोरेगाव: दि २५- सध्या रायगड जिल्ह्यासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत असतानाच मृत्यूच्या आकडेवारीत भर पडत आहे. वाढता मृत्यूदर नियंत्रणात यावा, यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम राज्यात दि.15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहें. याच पार्श्वभूमीवर माणगाव प्रांत अधिकारी प्रशाली दिघावकर यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाचे कर्मचारी काम करीत आहेत.
त्यानुसार या वेळी प्रांत कार्यालयाचे नायब तहसील विलास वाघमारे , गोरेगाव तलाठी श्री. मोरे व श्री आमरे व अशा वर्कर गोरेगाव आशा यांच्यासह, मोहिमेस गोरेगाव येथे जोरदारपणे सुरुवात करण्यात आले . तसेच ठिकठिकाणी सुरू असलेल्या मोहिमेत स्वत: सहभागी झाले. त्यांनी घरांना भेटी देत कोविड - 19 विषयी जनजागृती केली व प्रत्यक्षात थरमल स्कॅनर, ऑक्सिमीटरद्वारे घरातील सदस्यांची आरोग्य तपासणी केली.



0 टिप्पण्या