एस टी महामंडळाची लालपरी अन्न नागरी पुरवठा विभागाच्या मदतीला.


पोलीस प्रवाह न्यूज़

राज्य पुरवठा विभागाची सुधारीत वितरण पध्दती.

रायगड : दि. ११- काेराेना व लाँकडाँऊन आणि अनेक आपदानंतर बहुतांशी सर्वच क्षेत्रात आर्थिकमंदी आली.अणि अनेक उद्याेग व्यवसायांची देखील त्रेधातिरपीट उडाली. या मध्ये राज्य शासनातील अनेक महामंडाळे देखील याला अपवाद ठरली. त्यापैकी एक महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळ नेहमीच अर्थसंकल्पात ताेट्यात असणारी M.S.R.T.C. या लाँकडाऊन मध्ये आर्थिक तळाला पाेहचली मात्र राज्य शासनाच्या कदाचित एक मेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र राज्यशासनाने शासनाच्या ताेट्यातील उद्याेंगांना आधार देण्याचे काम केले आहे. अनेक दिवस ठप्प झालेली लालपरी आता राज्यशासनाच्या पुरवठा विभागाचे धान्य तालुका पुरवठा विभाग ते दुकानदार व मुख्य गाेडाऊन ते तालुका गाेडाऊन असा प्रवास करत आहे. शासनाच्या ( लक्ष निर्धारीत सार्वजनिक वितरण पध्दती , सुधारीत वितरण पध्दती) नुसार ह्या गाड्या तांदुळ गहु आणि धान्य वाहतुक करताना दिसताना यावरुन राज्यशासनाच्या दुरगामी विकासात्मक धाेरणांचा द्रुष्टीक्षेप नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. चालु ठेकेदारांना साेबत ठेऊनच महामंडळाच्या गाड्या वाहतुक करत असल्यामुळे शासनाचा पैसा शासनाच्या दुसर्या विभागातच राहत असल्यामुळे लाँकडाऊन मुळे पाठीमागे आलेल्या राज्याच्या आर्थिक घडीला नियंत्रणात आणण्याची शासनाची ही धाेरणात्मक पाऊले असल्याचेही सुजाण नागरिकांमध्ये बाेलले जात आहे.

माणगांव शहरातुन माणगांव पुरवठा विभागाच्या गाेदामाकडे एस टी महामंडळाच्या ट्रक ची वाहतुक हाेताना दिसल्याने माणगांवातील सुजाण पत्रकारांनी एसटी महामंडळ व पुरवठा विभाग यांच्या अधिकार्यांशी चर्चा केली असता ही राज्य शासनाची सुधारीत वितरण पध्दती असल्याची माहीती मिळाली. राज्य शासनाच्या लक्ष निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे माणगांव तालुक्यातुन काैतुक हाेताना दिसत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या