*कोल्हापूर - हरवलेली सोन्याची लगड प्रामाणिकपणे परत,,,** - *श्री.मकरंद पावले यांचे सर्वत्र होतेय कौतुक,,,*



कोल्हापूर - प्रतिनिधी 

काल दुपारी सुमारे १ च्या सुमारास बंगाली कारागीर *कु. राजकुमार बिछाई* यांची वजन ५ ग्रामची सोन्याची लगड योशोदीप टेस्टिंग परिसरात पडली होती, शोधा शोध घेता न सापडल्याने त्याने कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. कुलदीप गायकवाड आणि कोल्हापूर बंगाली कारागीर संघाचे अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक यांना माहिती दिली, 


     याच वेळी सायंकाळी ५ वाजता ही लगड बाजारातील सराफ व्यावसायिक *श्री. मकरंद पावले* पद्माशांती मार्केट याना सापडली त्यांनी तात्काळ श्री. कुलदीप गायकवाड यांचेशी संपर्क साधला...


    दोन दिवसात "जनता कर्फ्यु" लागण्याची चिन्हे दिसत असताना आज बऱ्याच व्यापारी संघटनेच्या मीटिंग होत्या, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचीही मीटिंग नियोजित असल्यामुळे मा. अध्यक्ष यांनी सायंकाळी ६ वाजता मीटिंग संपल्यावर श्री. मकरंद आणि बंगाली कारागीर राजकुमार यांना बोलवले शहानिशा करून राजकुमार यास लगड परत केली.. 


   यावेळी संघाचे सेक्रेटरी अनिल पोतदार यांचे हस्ते श्री. मकरंद यांच्या प्रामाणिकपणा बद्दल सत्कार करण्यात आला यावेळी, माजी उपाध्यक्ष राजेश राठोड, सभासद शीतल पोतदार आणि स्टाफ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या