आपत्ती काळात पवारसाहेबांचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे - खा . सुनील तटकरे
गोरेगाव: दि. ८ - कोविड 19 च्या काळात विद्यापिठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा रखडल्याचे माझ्या सह सर्वच पालकांना आणि विद्यार्थ्याना टेन्शन आहे . परिक्षा घ्याव्या असे युसीजी म्हणते तर परिक्षा घेण्यास राज्य सरकार तयार नाही . याबाबत न्यायालयात याचिका दाखल आहे त्याचा १० ऑगस्टला निर्णय अपेक्षित आहे , पण आता हा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करित , खा सुप्रिया सुळे यांनी प्राध्यापकांना काय वाटते त्यांनी आपली मते आमच्याकडे पाठविण्याचे आवाहन केले . तर देशात व राज्यात ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती येथे त्या त्या वेळी खा शरद पवार साहेबांचे मार्गदर्शन मोलाचे असते . असे प्रतिपादन खा सुनील तटकरे यांनी केले .
निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या १६ महाविद्यालयांना राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने १०० संगणक आणि तत्सम महाविद्यालयीन शैक्षणिक साहित्य देण्यांत आले. गोरेगांव येथील दोशी वकील महाविद्यालयात झालेल्या संगणक वाटप कार्यक्रमात खा सुप्रिया सुळे आणि खा सुनील तटकरे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर खा सुनील तटकरे , पालकमंत्री ना अदिती तटकरे , आ. अनिकेत तटकरे , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड , तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे , विद्यापिठाचे जॉईंट डायरेक्टर संजय सावंत , डॉ़ शिवारे , सभापती श्रीमती जाधव , सरपंच जुबेर अब्बासी , डॉ . संजय जगताप कॉलेजचे चेअरमन दिलीप शेठ आदि मान्यवर उपस्थित होते .
यावेळी खा सुळे यांनी केंद्र सरकार नविन शैक्षणिक धोरण आखत आहे याबावत शिक्षक व प्राध्यापक वर्गाच्या सूचना माला मिळाल्या तर त्याबाबत आम्हाला यावर आमचे मत मांडता येईल , असे सांगून त्यांनी तशा सूचना करण्याचे आवाहन शिक्षकांना केले .
खा सुनील तटकरे यांनी काहीही होवो कोकणी माणूस ताठ उभा राहतो . म्हणूनच गेल्या ८ ते १० वर्षातील दहावी व बारावीचे निकाल पाहिले तर त्यात कोकण नेहमी अव्वल असतो . चक्रीवादळानंतर पवार साहेबांनी कोकण दौरा केला त्यांनी येथील परिस्थिती पाहिली आणि त्यानंतरच आतापर्यंतची सर्वाधिक नुकसान भरपाई देण्याची सूचना राज्य सरकारला केली इतकेच नव्हे तर पक्षाच्या माध्यमातून कोकणातील नुकसानग्रस्त महाविद्यालयांना पत्रे , संगणकांची मदत केली. यावेळी ना अदिती तटकरे यांनी पक्षाच्या माध्यमातून महाविद्यालयांना केलेल्या मदतीची माहिती दिली .
यावेळी सर्व लाभार्थी महाविद्यालयांना प्रातिनिधीक स्वरूपात मदतीची पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली तसेच गोरेगांव येथील दहावी व बारावीतील पहिल्या तीन गुणवंतांचा सत्कार करण्यात आला . झूम कॉल बरीच झाली, व्हि सी झाली आता कंटाळा आला. आता माणस पहिली की बरं वाटतं कारण माणुसकीचा वा नात्याचा ओलावा तो फोन मधुन येत नाही असे प्रतिपादन खा. सुळे यांनी कोरोनो च्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या ऑनलाईन होणाऱ्या बैठकान वर बोलत होत्या.


राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने १०० संगणक आणि तत्सम महाविद्यालयीन शैक्षणिक साहित्य देतांना खा. सुप्रिया सुळे , खा. सुनील तटकरे , पालकमंत्री अदिती तटकरे , राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड व आ. अनिकेत तटकरे
0 टिप्पण्या