माणगाव येथे रानभाजी महोत्सव साजरा


गिरिश गोरेगावकर , प्रतिनिधी 

माणगाव- : दि. ९ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त माणगांव येथे रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला. पावसाळी हंगामात रानातील व जंगलातील रानभाज्या आदिवासी महिला भगिनी मोठ्या प्रमाणात भाजी बाजारात विक्री करतात. रानभाज्याना मनुष्य आहारात खूप महत्त्व आहे. त्यामध्ये असलेले जीवनसत्त्व मानवी आरोग्याला अतिशय फलदायी आहे.

      रानभाज्यान मध्ये  करटोळी, टाकला, अळू, कुडाच्या शेंगा, रानटी माट, भारंगे, बिंडा व मसाल्याची पाने, बांबूचे नवीन कोंब ई. रानभाज्या माणगाव बाजारपेठेत विकल्या जातात. गांगवली  आदिवासीवाडी येथील महिला भगिनी पार्वती हिलम, सुरेखा वाघमारे या जिजाई महिला शेतकरी गटाचे सदस्य आहेत. या गटातील महिला रानभाज्या व भाजीपाला करीत शेतीतून उत्पन्न घेतात.
       या प्रसंगी रानभाज्या महोत्सवात  तालुका कृषी अधिकारी पी. बी. नवले यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्व तसेच आदिवासी  महिलांना रोजगाराची चांगली संधी असल्याबाबतची माहिती दिली.    यावेळी गणेश शिगवण, सुरेश पवार, तुकाराम तेटगुरे, बाळाराम उभारे, सुरेश मुंढे, मधुकर शिवदे ई. शेतकरी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या