प्रतिनिधी - चिंचवड
आज दिनांक 6/08/2020 रोजी प्रांत ग्राहक संरक्षण समितीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेता मा. नामदेवजी ढाके यांना महानगरपालिका हद्दीतील खाजगी शाळांची फी माफी मिळावी याबद्दल निवेदन देण्यात आले.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आर्थिक चक्र मंदावले आहे. त्यात दैनंदिन उपजीविका भागवणे सुद्धा खूपच अडचणीचे झाले आहे. त्यात मुलांचे भविष्य घडवण्याचा मोठा जटील प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यातच अनेक शाळा पालकांना फी साठी तगादा लावत असल्याने पालक त्रस्त आहेत त्यांना दिलासा मिळावा म्हणून पालिका प्रशासनाने महानगरपालिका हद्दीतील खाजगी शाळांची फी माफी करून पालकांना दिलासा द्यावा.
कारण सध्या विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत हजर न राहता फक्त ऑनलाईन अभ्यासासाठी फी आकारु नये. तसेच विद्यार्थ्यांची कोणतीही वाहतूक होतं नसताना वाहतूकीचा खर्चही वगळन्यात यावा.
वरील विषयीं प्रांत ग्राहक संरक्षण समितीने नम्र निवेदन देण्यात आले.




0 टिप्पण्या