प्रतिनिधी - उस्मानाबाद
हॅलो तुम्ही प्रमोद वाघमारे बोलत आहेत का ? मी , या जिल्ह्यातून बोलत आहे मी पोलीस दलात पोलीस अधिकारी / पोलीस कर्मचारी आहे , आमच्या समस्या तुम्ही सोडवणार का ? असा प्रश्न विचारल्यास समोरून एकच उत्तर येणार की , हो मी प्रमोद वाघमारे बोलत आहे तुम्ही काहीही काळजी करू नका पोलीस बॉईज असोसिएशन ही महाराष्ट्र पोलीसांचे व त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न सोडवण्यासाठीच स्थापन करण्यात आली आहे, मला तुमची अडचण सांगा तुमची अडचण सोडवण्याचा आम्ही 100 % प्रयत्न करू.
अतिषय शांत व मनमिळाऊ स्वभाव असणारे प्रमोद तानाजी वाघमारे हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील असून ते सध्या उस्मानाबाद शहर पोलीस लाईन मध्ये राहत असून , महाराष्ट्र पोलीसांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी याच जिल्ह्यातून विविध प्रकारची आंदोलने करून पोलीस बॉईज असोसिएशनच्या कामाला सुरुवात केली आहे.
सन 2013 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये प्रमोद वाघमारे यांनी पोलीस बॉईज असोसिएशनची स्थापना करून महाराष्ट्र पोलीसांच्या पाठीशी खंबीर अशी भिंत उभी केली आहे. सन 2013 ते आजपर्यंत म्हणजेच सन 2020 पर्यंत पोलीस बॉईज असोसिएशनची पाळेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात रोवण्यासाठी प्रमोद वाघमारे यांनी खूप खडतर प्रवास केला आहे. अतिशय कठीण परिस्थिती मध्ये सर्व अडथळे दूर करून स्वखर्चाने संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करून पोलीस बॉईज असोसिएशन स्थापन करण्यामागचा उद्देश प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या घराघरार पोहोचवला आहे.
प्रमोद वाघमारे यांनी पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून अडचणी मध्ये असलेल्या महाराष्ट्रातील अनेक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. व अद्यापही हे कार्य सुरूच आहे, पोलीस बॉईज असोसिएशनचे हे कार्य संपूर्ण महाराष्ट्राभर पसरले असून प्रमोद वाघमारे हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीसांच्या घराघरात पोहोचले आहे.
महाराष्ट्रातील अनेक पोलीस अधिकारी / पोलीस कर्मचारी हे अभिमानाने सांगत असतात की पोलीस बॉईज असोसिएशनमुळे आमच्या अडचणी दूर होतात, त्यामुळे आम्हाला खूप मोठा आधार मिळाला आहे. प्रमोद वाघमारे यांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे हे कार्य पुढे सतत चालू राहण्यासाठी मागराष्ट्रातील अनेक जन त्यांना फोन करत असतात.
महाराष्ट्रातील 20 ते 21 जिल्ह्यात पोलीस बॉईज असोसिएशनची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली असून या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष हे पोलीसांच्या मदतीला धावून जातात. तसेच गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात सुद्धा कोणाच्याही दबावाला बळी न पडता पोलीस बॉईज असोसिएशनचे काम सुरू आहे, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.
महाराष्ट्र पोलीसांच्या मदतीला धावून जाणाऱ्या या युवा नेतृत्वाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
प्रमोद वाघमारे यांच्या या कार्याबद्दल या ठिकाणी दोन शब्द बोलावेसे वाटतात
।। लहरोसे डरकर नौका कभी पार नही होती ! और कोशीष करनेवालोकी कभी हार नही होती.।।
महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी आपल्या कोणत्याही समस्या असतील तर प्रमोद वाघमारे यांना फोन करावा.
प्रमोद तानाजी वाघमारे
संस्थापक अध्यक्ष
पोलीस बॉईज असोसिएशन
महाराष्ट्र राज्य
मो - 9604972682 / 8669838008
जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस !



0 टिप्पण्या