प्रतिनिधी - पिंपरी चिंचवड
पोलीस मित्र संघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदासाठी अनेक जन इच्छुक होते व इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष गायकवाड यांनी या क्षेत्रामध्ये केलेले कार्य व असणारा अनुभव याचा विचार करून संघांचे अध्यक्ष मा. श्री. शाम घाडगे यांनी त्यांची निवड या पदासाठी केली. पोलीस मित्र संघांचे काम राज्यभर वाढवून गोरगरिबांना न्याय देऊ व युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी कार्यरत राहू असे प्रतिपादन श्री. गायकवाड यांनी यावेळी बोलताना केले. कायदेविषयक सल्लागार श्री अजित बोराडे यांनी मार्गदर्शन केले. निगडी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी श्री. महेंद्र आहेर, श्री. राजेश मोरे, श्री. के .बी. माकणे, श्री. पी.आर. लोखंडे, श्री. सुनील जाधव,श्री. तानाजी सोनवणे व बहुसंख्येने पोलीस मित्र उपस्थित होते. पुणे जिल्हा प्रतिनिधी श्री. धर्मराज बनसोडे न्यूज मध्ये मा पंकज नवगिरे , मा किशोर जाधव यांनीही सहकार्य केले व आभार प्रदर्शन केले.



0 टिप्पण्या