गिरिश गोरेगावकर, प्रतीनिधी
माणगाव : दि १७ - निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानी मुळे संपुर्ण काेकणासह रायगड जिल्ह्याचे कंबरडे माेडलेले असताना काही तांत्रिक कारणे वगळता राज्यातील अद्यापर्यंत आलेल्या आपत्तीपैकी सर्वात आगाेदर मदत ही काेकणातील निसर्गचक्रीवादळग्रस्तांना मिळाली असल्याचे प्रतिपादन खास तटकरे यांनी केले. यावेळी माणगांव तालुक्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय भवनात १७ आॅगस्ट राेजी रायगड लाेकसभा ३२ चे खासदार तटकरे यांनी निसर्गचक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या रक्कमेचा आढावा घेतला. माणगांवचे पत्रकारांनी निसर्गचक्रीवादळ नुकसानग्रस्तांच्या प्रश्ना संदर्भातील त्रूटी दुरुस्ती व न्याय मिळवून देण्यासाठी ७ सप्टेंबरला उपोषणास बसणार असल्याचे पत्र राज्याचे महसूलमंत्री,रायगडच्या पालकमंत्री, व खासदार सुनिल तटकरे यांच्या नावे दिले असल्याने या पत्राचा खुलासा खासदारांनी पत्रकार परिषद बोलावून केला. यावेळी माणगांव तालुक्यातील बहुतांशी पत्रकार व माणगांव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर-जाधव, तहसिलदार प्रियांका आयरे- कांबळे, नायब तहसिलदार भाबड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, माणगांवचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव व तालुक्यातील विविध बँकाचे अधिकारी व विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित हाेते. यावेळी तालुक्यातील नुकसान ग्रस्तांना सुमारे ९७% नुकसानभरपाई मदत खात्यात जमा झाली असल्याचे माणगांव तहसिलदार यांनी स्पष्ट केले. व काही मानवी चुकांमुळे पंचानाम्यात असलेल्या त्रुटी आपल्यापर्यंत काेणीही नुकसानग्रस्त घेऊन आल्यास पत्रकार बांधवानी संबधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणुन देऊन मदत मिळवुन देऊन नुकसानग्रस्तांस सहकार्य करावे, असे आवहान खासदार तटकरे यांनी पत्रकार परीषदेत केले आहे.
तसेच माणगाव तालुक्यातील बेलदर समाजाची घरे हि वनविभागाच्या जागेत असल्याने त्याना शासन भरपाई देउ शकत नाही. आदिवासी समाजाला मात्र वनविभागाची जागा कायद्यानुसार त्याना देता , त्याना वनविभागाच्या जागा त्यांच्या नावे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वन विभागात राहणाऱ्या आदिवासी बांधवाना नुकसान भरपाई मदत दिल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले.
पंचनाम्यात जर काही चुका झाल्या असतील तर संबधीत व्यक्तीचा अर्ज आणून संबधित प्रांत व तहसील कार्यालयात अधिकाऱ्याना दाखवावे . पंचनामा व आपल्याला मिळालेली शासन मदत यात काही तफावत असेल तर दोन दिवसात त्याचा निर्वाळा करून मिळेल असे हि खा. तटकरे यांनी यावेळी बोलून प्रांत व तहसीलदाराना सूचना दिल्या.
घरगुती वापराची भांडी वापराचे कपडे या साठी हि काल परवा जिल्हाधिकारी याच्याकडे शासनाने फंड जमा झाल्याचे सांगून, पंचनाम्यात घरगुती भाडी व कपड्यान साठी नुकसानग्रस्तांना आलेल्या वाढीव मदत रक्कम देखील नुकसानग्रस्तांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करावी असे आदेश देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
चौकट - शासन निर्णयानुसार घर नुकसानीत झालेल्या पंचनाम्यात जी रक्कम व शासनाने ठरवलेली मदत यांमध्ये जी कमी रक्कम असेल ती रक्कम नुकसानग्रस्त व्यकीस अदा करण्यात यावे असे ठरल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले.यावेळी शासन निर्णय खा. तटकरे यांनी वाचून दाखविले.
पोलीस प्रवाह न्यूज़




0 टिप्पण्या