*प्रतिनिधी : सचिन जगताप*
केंद्रीय गृह विभाग भारत सरकार तर्फे सलग दोन वर्ष नक्षलवाद्यांविरुद्ध अतिदुर्गम भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल *आंतरिक सुरक्षा सेवा पदक* विजेते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अभिजीत जाधव सर यांच्याशी पोलीस प्रवास चे पत्रकार सचिन जगताप यांनी केलेली खास बातचीत. नक्षलग्रस्त भागांमध्ये कशा पद्धतीने काम करावं लागतं, काय अडचणी येतात याबाबतीत सरांनी त्यांचा अनुभव सांगितला. आज समाजाला अभिजीत जाधव सरांसारख्या व्यक्तिमत्त्वाची नितांत गरज आहे. प्रसंगी नक्षलवाद्यांशी दोन हात करून नागरिकांचे कशा पद्धतीने संरक्षण पोलीस खात्यातर्फे केले जाते याचे जिवंत उदाहरण म्हणजे श्री अभिजीत जाधव सर. आपल्या या कार्याला पोलीस प्रवाह परिवारातर्फे मानाचा सलाम व आंतरिक सुरक्षा सेवा पदक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
यावेळी अखिल युवा पत्रकार संघाचे पिंपरी-चिंचवड शहर सचिव मा. अजिद इनामदार, खेड विभाग अध्यक्ष मा. रामदास येळवंडे, तसेच चिंचवड विभाग अध्यक्ष मा. उदय निकम, पोलीस प्रवाहचे पत्रकार मा. राहुल जगताप यांनी साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.





0 टिप्पण्या