वैभव सत्वे, प्रतिनिधी
माणगाव : दि १९- लॉकडाऊनच्या काळामध्ये व निसर्ग चक्रीवादामुळे झालेल्या वादळग्रस्तांच्या नुकसणीमुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत वीज बिल माफ करण्याबाबत दि. १९ ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्ष माणगांव तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव तहसीलदार प्रियांका आयरे यांना निवेदन देण्यात आले.
लॉकडाऊन काळात बहुसंख्य लोकांना रोजनार नाही. जनतेचे अर्थचक्र पूर्णपणे थांबलेले आहे. संपूर्ण जनता अडचणीत आहे. तरी सुद्धा महावितरण कंपनी लोकांना मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने जास्त वीज बिल देत आहेत. याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना वीज बिल माफ करण्यात यावे. वीज बिलांचे इतर सर्व आकार माफ करण्यात यावेत. कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवावा. या मुद्याचा सहानभूती पूर्वक विचार करण्यात यावा व वीज वितरन कंपनीने नागरिकांवर कोणताही प्रकारे अन्याय होऊ देऊ नये अन्यथा शेकाप मार्फत आंदोलन करण्यात येईल असे शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते अस्लमभाई राऊत, तालुका चिटणीस रमेश मोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निलेश थोरे, शेकाप नेते विलास मोरे, मधुकर अर्बन, विलास गोठळ, नथुराम आडीत, स्वप्नील सकपाळ, दिनेश गुगळे, रमेश बक्कम, बळीराम खडतर, गोविंद पवार, सुरेश अर्बन आदींसह शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



0 टिप्पण्या