अरुण पवार ,प्रतिनीधी
माणगाव : दि २० - कोरोना आणि निसर्ग वादळा नंतर आलेल्या भीषण संकटाला तोंड देण्यासाठी शासनाने मोठं मोठ्या घोषणा केल्या मात्र या घोषणा हेवतच विरल्या आहेत. बहुतांश लोकांना नुकसान भरपाई मिळाली नसून काही गावात आद्यापही वीज पोचलेली नाही.त्या गावात रॉकेल सुधा पोचले नसल्याने या गावातील जनता हतबल झाली आहे.
शासनाच्या योजना जनसामान्य पर्यंत पोचणार की नाही ? असा प्रश्न माणगाव तालुका शे.का. प चिटणीस रमेश मोरे यांनी उपस्थित केला.
दि ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळाने थैमान घालून माणगाव तालुक्यात अतोनाहात नुकसान केले. या वेळी तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत पोल पडल्याने संपूर्ण तालुक्यात विद्युत पुरवठा खंडित झाला मात्र या गोष्टी ला आज दीड महिना उलटून गेला तरी देखिल तालुक्यातील काही भागात अजून विद्युत पुरवठा पोचलेला नाही.तसेच या वेळी शासनाच्या मध्यातून ५ लिटर घरटी रॉकेल देण्याचे जाहीर करण्यात आले मात्र यात ५०% जनतेला २ लिटर रॉकेल देण्यात आले असून ५०% जनतेला या शासनाने थुक लावाईच काम केलेला आहे.
या बाबत माणगाव तहसीलदार यांना शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी चवकशी केली असता त्यांनी सांगितले पुरवठा अधिकारी यांच्या कडे चवकशी करा रमेश मोरे यांनी पुरवठा अधिकारी यांच्या कडे फोन करून चवकशी केली अस्त तालुक्यात १४ टँकरची मागणी असून शासनाकडून फक्त ७ टँकर उपलब्ध झाले.
एस डी पिओ अलिबाग यांच्या जवळ संपर्क साधला असता त्यांनी सांगितले शासनाकडून पुरवठा होत नाही ज्यावेळी शासनाकडून पुरवठा होईल त्यावेळी आम्ही आपणास देऊ मात्र अजून तालुक्यातील काही दुर्गम भागात विद्युत पुरवठा पोचलेला नाही. त्यामुळे रॉकेलची या भागातील लोकांना नितांत गरज असून याकडे पालकमंत्री , आमदार, खासदार लक्ष देतील का असा सवाल माणगाव तालुका शे.का. प चिटणीस रमेश मोरे यांनी उपस्थित केला.
निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानाची पंचनामे मात्र झाले मोठं मोठ्या घोषणा देखील झाल्या मात्र अनेक शेतकरी , गोर गरीब जनता या नुकसान भरपाई पासून अजून वंचित आहे. या बाबत रमेश मोरे यांनी माणगाव तहसीलदार यांच्या कडे चवकशी केली असता आम्ही बँकेत पाठवली आहे तिकडे चवकशी करा बँकेत चवकशी केली असता आमच्या कडे आलेले नाहीत असे उत्तरे मिळून जनतेला हेलपाटे मारावे लागत असल्याची खंत मोरे यांनी व्यक्त केली. मात्र जे शासना कडून मंजूर झालेली नुकसान भरपाई ती तरी मिळावी अशी आपेक्ष जनता करत आहे.
शासनाची मदत आल्या नंतर काही वादळ ग्रस्तांना धनादेश देतनाचे छाया चित्र प्रसिध्दी साठी देणेत आले मात्र त्या नंतर लोकांना मदत मिळाली की नाही या साठी कोणीही प्रयत्न केले नाहीत केवळ प्रसिध्दी च्य हवशे पोटी प्रसिध्दी मिळवली.
या साठी स्थानिक आमदार असणे गरजेचे आहे याचा अनुभव लोकांना आला आहे. स्थानिक आमदार अस्था तर जनतेने
हक्का ने कामे करून घेतली अस्थी परंतु स्थानिक आमदार नसल्याने माणगाव तालुक्या कडे अक्ष्यम असे दुर्लक्ष होत आहे अशी खंत मोरे यांनी व्यक्त केली.
या झालेल्या गैर सोय बद्दल शेकाप चे आमदार जयंत पाटील यांच्या कडे निवेदन दिले आहे. या वर ते विधान परिषदेत सरकार ला या बाबत जाब विचारणार आहेत. त्यातपूर्वी माणगाव तालुक्यातील वादळ ग्रस्थना ४ दिवसात नुकसान भरपाई व रॉकेल मिळाले नाही तर संबधित बँक आणि तहसिल कार्यालय वर मोर्चा काडणार असा इशारा तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी केले आहे.
पोलीस प्रवाह



0 टिप्पण्या