रोहितदादा पवार विचार मंच महाराष्ट्र राज्य, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष पदी प्रदीप यशवंत कोंडेकर यांची निवड.


रामजी कदम, प्रतिनिधी

निजामपूर : दि २१- महाराष्ट्रात सामाजीक क्षेत्रात कार्य करणाऱ्या रोहितदादा पवार विचार मंच महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष पदावर माणगाव तालुक्यातील केळगण गावचे युवा उद्योजक प्रदिप कोंडेकर यांची निवड झाली असून ,  प्रदेशाध्यक्ष श्री. राजू पाटील बोंबले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

       छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत रोहित दादा विचार मंच महाराष्ट्र कार्य करत आहे. रोहित दादा पवार यांच्या कडे राजकारणा व्यतिरिक्त शिक्षण, आरोग्य, क्रीडा, आणि मुखतः शेती व्यवसाय या सर्व विषयांची अभ्यासपूर्ण जाण आहे आणि हाच विचार महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी रोहितदादा पवार विचार मंच या संघटनेची स्थापना करण्यात आली.

माणगाव तालुक्यात सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करत असलेल्या , तसेच दांडगा जनसंपर्क असलेल्या प्रदिप कोंडेकर यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याने कौतुक व्यक्त होत आहे.

रोहितदादा पवारांच्या तडफदार नेतृत्वाखाली  दक्षिण रायगड जिल्ह्यात सामाजिक व राजकीय विधायक कार्य प्रामाणिक व नियोजनबद्ध पद्धतीने साकारत समाजकार्याचा वसा जोपासू असा विश्वास यावेळी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप यशवंत कोंडेकर यांनी व्यक्त केला.

                               पोलीस प्रवाह न्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या