कोल्हापूर (प्रतिनिधी) : विनायक सातुसे
गेल्या १५ दिवसातील कोरणाची वाढती संख्या आणि लॉकडाऊन करण्याची सर्वांनी मांडलेली भूमिका लक्षात घेता अखेर पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज निर्णय घेऊन जिल्ह्यात सोमवारपासून ७ दिवसांचा शंभर टक्के कडकडीत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीशी व्हीसीद्वारे बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. यामध्ये काहींनी विरोध केला तर काहींनी सकारात्मकता दर्शवली.यावेळी केवळ दुध पुरवठा आणि औषधे दुकाने सुरू राहणार आहेत इतर सरकारी कार्यालये त्याचबरोबर खाजगी कार्यालये बंद राहणार.संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.पालकमंत्री सतेज पाटील,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ राज्य आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर महा पालिका आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल इ. उपस्थित होते.



0 टिप्पण्या