जळगाव / प्रतिनिधी :-
दिनांक 17 / 07 / 2020 रोजी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका येथील रहिवासी असलेले पोलीस बॉईज डॉ.अतुल अशोक पाटील यांची जळगाव जिल्हा पोलीस बॉईज असोसिएशनच्या जिल्हा मार्गदर्शक या महत्वाच्या पदावर निवड करण्यात आली आहे. डॉ.अतुल पाटील हे सन 2016 पासून पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून पोलीसांसाठी काम करत आहेत, तसेच डॉ.अतुल पाटील हे जळगाव जिल्हा डॉक्टर असोसिएशनचे सचिव देखील आहेत.
आपले हॉस्पिटल सांभाळून ते वेळ मिळेल त्या प्रमाणे पोलीसांच्या समस्या देखील सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे हे उल्लेखनीय काम पाहून , पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी डॉ.अतुल पाटील यांची जळगाव जिल्हा मार्गदर्शक पदी निवड केल्याचे जाहीर केले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल पोलीस बॉईज असोसिएशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष नितीन ब्राह्मणे - जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मंगलसिंग राजपूत - जळगाव महानगर अध्यक्ष किरण राजपूत - भुसावळ तालुका अध्यक्ष दिनेश उर्फ पिंटू परदेशी - चाळीसगाव तालुका अध्यक्ष निखिल सोनवणे - पाचोरा तालुका अध्यक्ष नदीम शेख - चोपडा तालुका अध्यक्ष किशोरकुमार वाघ उर्फ मुन्ना ठाकूर - या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.



0 टिप्पण्या