कोल्हापूर - कर्तव्यदक्ष पोलीस मा.राजीव सावंत(पो.कॉ.)यांना पोलीस प्रवाह न्यूज तर्फे "कोविड योद्धा"पुरस्काराने सन्मानित


प्रतिनिधी - कोल्हापूर

२१ मार्च पासून गेले 4 महिने कागल पोलीस स्टेशनचे पोलीस काॅ. आर. पी. सावंत हे कागल पोलीस ठाणे हद्दीतील २७ गावे बलेरो पिकअप अनौन्समेंट वाहन घेऊन पेट्रोलिंग करुन प्रत्येक गावामध्ये जाऊन तेथील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक व सदस्य इत्यादींना एकत्रित हाताशी घेऊन कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यवस्थितपणे माहिती देऊन गावपातळीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचे मार्गदर्शन करुन व गावामध्ये स्वयंसेवकाची नेमणूक करुन तसेच कर्नाटक राज्याला लागून असलेले सीमाभाग बंद करून व सीमाभागातील म्हाकवे, करनुर, शेंडूर, वंदुर, या गावातील सरपंच, पोलीस पाटील, स्वयंसेवक, ग्रामसेवक व ग्रामसदस्य यांना हाती घेऊन एक आगळ्यावेगळ्या पध्दतीने कोविड १९ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगली कामगिरी करत आहे. आणि त्यांच्या प्रेमळ वागणुकीमुळे कागल तालुक्यातील सर्व जनतेच्या मनात एक वेगळं प्रेमळ स्थान निर्माण केलेले आहे.
   हे सर्व कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड १९ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  चांगली कामगिरी बजावली आहे.
   तरी त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस प्रवाह न्युज च्या वतीने "कोविड योद्धा" या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले .

   यावेळी उपस्थित माजी सैनिक मा.अजित पाटील,मा.अशोक पाटील,नितीश पोतदार(सर) विनायक सातूसे(दैनिक पत्रकार पुढारी),विजय पोवार,मा.विनायक औताडे साहेब,मा.दिग्विजय पांडूरंग मर्दाने साहेब ,मा.रोहन वाकरेकर साहेब, आर.आर.पाटील साहेब,राजकुमार माने(मेजर).तसेच पोलीस प्रवाह न्यूज पत्रकार विवेक पोतदार व त्यांचे सहकारी...
         पोलीस प्रवाह न्युज संपर्क -9850358005

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या