माणगाव तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने कृषी दिन साजरा .

गिरीश गोरेगावकर, प्रतिनिधी

माणगाव : दि ३ -  एक जुलै 2020 रोजी माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचा जन्म दिन निमित्त कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो  त्यानिमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय माणगाव यांच्या वतीने तालुका क्रुषि अधिकारी श्री.पी.बी. नवले  यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कृषी दिन कार्यक्रम साजरा केला. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी श्री शरद धर्माधिकारी व मंडळ कृषी अधिकारी इंदापूर किरण पडवळकर उपस्थित होते . तसेच सर्व कृषी सहाय्यक या वेळी उपस्थित होते.

       हरित क्रांतीचे प्रणेते माननीय वसंतराव नाईक यांचे कृषी उत्पादन वाढीमध्ये अतिशय मोलाचे योगदान असून हरितक्रांतीचे प्रणेते आहेत असे गौरवोद्गार तालुका क्रुषि अधिकारी श्री पी बी  नवले यांनी या प्रसंगी  काढले महाराष्ट्राटील शेतकऱ्यांचे विकासाचे शिल्पकार असल्याचे त्यांनी यांनी यावेळी बोलून दाखविले.

    यानंतर सर्व कर्मचारी सह क्रुषि अधिकारी श्री नवले यांनी मौजे दाखणे येथे शेतकरी सागर यांच्या शेतावर जाऊन रत्ना नावाच्या वाणची पहाणी केली. माणगाव तालुक्यात एकूण 12500 हेक्टर भातशेती लागवडीखाली येत असुन आतापर्यंत 5000 हेक्टर भातशेती लावणी करून झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
       
                             पोलीस प्रवाह न्यूज
                   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या