मावळ - तळेगाव स्टेशन येथील गणेशोत्सव व दहीहंडी उत्सव यंदा अशी असेल गणेशोत्सव आचारसंहिता जाहिर

प्रतिनिधी - ( मावळ ) शशिकांत चव्हाण

दि.२७ जुलै तळेगाव स्टेशन येथील ग्रामदैवत श्री हनुमान महाराज मंदिर येथे, तळेगाव स्टेशन भागातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती.

सदर मीटिंगमध्ये *गणेशोत्सवाची* आचारसंहिता जाहीर करण्यात आली त्याच प्रमाणे *दहीहंडी*  उत्सवा  संदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली... सर्व सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले. ही नियमावली रहिवासी सोसायट्यांना सुद्धा लागू होईल

गणेशोत्सव अचारसंहिता खालील प्रमाणे.
1) तळेगाव स्टेशन भागात कुठल्याही प्रकारचा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार नाही.
2) गणेशोत्सवातील मंडप साईज दहा बाय पंधरा राहील.
3) ज्या गणेशोत्सव मंडळांना मंदिर,समाज मंदिर किंवा बुद्ध विहार उपलब्ध आहेत त्यांनी मंडप न उभारता गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.
4) मंडळांनी कोणतेही आमंत्रित पाहुणे न बोलवता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना आरतीचा मान द्यावा.
5) मंडळांनी समाजोपयोगी कार्यक्रम जास्तीत जास्त राबवावे
6) मंडळांनी थोडक्यात लोकांमध्ये आरती करावी.
7) गणेश मुर्ती तीन ते चार फुटांपर्यंत घ्यावी.
गणेशोत्सव काळातील आगमन सोहळा व विसर्जन मिरवणूक सोहळा रद्द करण्यात येणार आहे.
9) मंडळांनी कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांकडून व व्यापाऱ्यांकडून वर्गणी घेऊ नये.
10) वरील सर्व नियमांचे आम्ही सर्व मंडळे काटेकोरपणे पालन करू...
*या मिंटीग मध्ये येथील सामाजिक* *कार्यकर्ते - किशोर आवारे , नगरसेवक - गणेश खांडगे , संतोष शिंदे , निखिल भगत , सुनिल पवार व* 
*कल्पेश भगत , सुनिल कारडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते...*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या