🚔 *पोलिस प्रवाह न्युज इफेक्ट* 🚔 कोल्हापूर - महिलांनी घेतला पुढाकार वृक्षरोपे लावली आणि त्याचे संगोपन देखील करू - सरपंच शिलाताई चौगले

कोल्हापुर प्रतिनिधी - विनायक सातुसे

साके ता.कागल तसे पहायला गेलं तर निसर्गाच्या खुशीत स्थित असलेलं गाव.मोठी वनसंपदा असलेल्या गावात फक्त वृक्षारोपण कार्यक्रम रुचला नाही. वृक्षारोपण साठी आणलेली झाडांची रोपे रस्ता लगत ठेवली होती.ती रोपणा अभावी तशीच पडुन होती अशी बातमी पोलिस न्युज प्रवाह ने प्रसिद्ध केली होती.संबंधित बातमीची सर्वत्र चर्चा झाल्याने त्याचा परिणाम असा झाला की गावातील महिला एकत्र येऊन त्याबद्दल विचारविनिमय केला गेला. आणि वृक्षारोपे लावण्यासाठी आम्ही सहकार्य करू असे सरपंच सौ. शिलाताई चौगले यांना सांगितले.

दरम्यान रोड वरील काही सुस्थितीत असणाऱ्या रोपांना एकत्र केले गेले.त्याचबरोबर अधिक रोपे मागणीनुसार पुरवठा देखील केला गेला.पुर्ण साके - सावर्डे रोड आणि तेथील परिसर स्वच्छ करून व्यवस्थित खड्डे काढुन रोपे लावली त्याचबरोबर त्या रोपांना पाणी देखील घालण्यात आले असुन. त्या झाडरोपांना लागणारे कुंपण आणि लागवड घालुन संगोपन करणार असुन ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे मनोगत व्यक्त केले.

साके आरोग्य विभागाच्या एस आर तब्बल जी ,साके ग्रामसेवक त्याचबरोबर गावातील महिला सारिका चौगले, सविता चौगले, आक्कताई गिरी ,सुरेखा चौगले पुनम चौगले यांनी श्रमदान केले.तर त्यासाठी तानाजी चौगले व मारुती पाटील तेजस्विनी पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या