पिंपरी चिंचवड - अत्यावशक सेवेत आपले कर्तव्य बजावत असणारे पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपलेखापाल सिध्दार्थ जगताप यांचे कोरोनामुळे निधन

प्रतिनिधी - सचिन जगताप

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपलेखापाल सिध्दार्थ जगताप (वय ५१) यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले.
     मागील ११ जुलैला ताप आल्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये पाॅझिटिव्ह आल्याचा अहवाल मिळाला होता.त्यानंतर त्यांना महापालिकेच्या भोसरी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते , १४ जुलै रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने वायसीएममध्ये दाखल करण्यात आले होते. आज पहाटे त्यांचे निधन झाल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. वायसीएममध्ये उपलेखापाल पदाची जबाबदारी ते सांभाळत होते.
त्यांच्यामागे पत्नी, 2 मुले आणि आई असा परिवार आहे. महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप व पत्रकार विजय जगताप यांचे ते चुलतबंधू होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या