भुसावळातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांमुळे ; सुमारे सवा दोन लाख रुपयाचा माल चोरणारा संशयित ताब्यात


जळगाव जिल्हा प्रतिनिधी - जितेंद्र चौधरी 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील सुरेंद्र वालवाणी रा. हनुमान नगर यांच्या मालकीच्या मॉडर्न रोड वरील  ओम इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात दिनांक 17 ते 18 रोजी दरम्यान अज्ञात चोरटानि दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून 2,26,350 रुपयाचा माल चोरीस गेला होता याबाबत दुकान मालक सुरेंद्र वालवाणी यांच्या फिर्यादीवरून दिनांक 18 रोजी अज्ञात चोरट्या विरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात भाग 5 गुरन 0739।/2020  भादवि कलम 454/457/380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र या चोरीबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्तवदक्ष पोलिश निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त खबरीवरून त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके तसेच सहायक पोलिस अधीक्षक डॉ गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरीक्षक संदीप परदेशी, अनिल मोरे, रमण सुरळकर, रवींद्र बिऱ्हाडे, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, कृष्णा देशमुख आदींचे पथक तयार केले व या पथकाने संशयित आरोपी फिरोज शेख अकिल गवळी ( वय 24 रा. भुसावळ ) रझाक उर्फ राजा शेख रहीम ( वय 28, रा. भुसावळ ) या दोन जणांना ताब्यात घेतले असून भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केल्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.           
      पोलीस प्रवाह न्युज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या