पोलीस बॉईज असोसिएशन अकोला जिल्हाध्यक्ष पदी विजय नावकार यांची नवीन निवड


अकोला /प्रतिनिधी :-

 दिनांक 08 / 07 / 2020 रोजी अकोला येथील रहिवासी असलेले पोलीस बॉईज विजय प्रकाश नावकार यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदी नवीन नियुक्ती करण्यात आली असल्याचे , पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक - अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी कळविले आहे.

    विजय नावकार यांनी
 आत्तापर्यंत दक्षता नगर पोलीस बॉईज मित्रमंडळच्या माध्यमातून पोलीसांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या बऱ्याच समस्या सोडवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. सध्याच्या कोरोनाच्या काळातही विजय नावकार हे पोलीसांच्या मदतीला धावून गेले आहेत, तसेच पोलीसांना मास्क वाटप करणे , त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे,तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, यासारखे सामाजिक कार्य सुद्धा केले आहे, व ते सुरूच आहे.

    त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पोलीस बॉईज असोसिएशन संस्थापक - अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी विजय नावकार यांच्यावर अकोला जिल्ह्याच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

      विजय नावकार यांच्या नवीन निवडीबद्दल - पोलीस बॉईज असोसिएशनचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सय्यदराजा मुजावर  :-  महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शैलेश पांडव :- विदर्भ अध्यक्ष शाहेदभाई सय्यद :- विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे  :- मुंबई सरचिटणीस संजय डे  :- महाराष्ट्र समन्वय मनोज देवकर  :- नागपूर जिल्हाध्यक्ष नोएल जोसेफ सर  :- गडचिरोली जिल्हाध्यक्ष गिरीश कोरामी  :- अहमदनगर जिल्हाध्यक्ष नौशाद शेख :- उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष मेजर महावीर तनपुरे :- सांगली जिल्हाध्यक्ष विषाल सागरे :- कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सतीश चव्हाण :- परभणी जिल्हाध्यक्ष शरद ठाकरस :- हिंगोली जिल्हाध्यक्ष आकाश पाचपुते :- जळगाव जिल्हाध्यक्ष नितीन ब्राह्मणे :- धुळे जिल्हाध्यक्ष बॉबी वाघ :- अकोला जिल्हा उपाध्यक्ष संदीप घाटे :- जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मंगलसिंग राजपूत या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या