शिर्डी - श्री साईबाबा संस्थान विश्वस्थ व्यवस्था शिर्डीच्या वतीने श्री गुरुपौर्णिमा उस्तव सांगता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते दहीहंडी फोडून झाली

प्रतिनिधी *शिर्डी :-* राहुल फुंदे


        श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिनांक ०४ जुलै पासून सुरु असलेल्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता आज काल्याच्या किर्तनानंतर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्‍या हस्‍ते दहिहंडी फोडून झाली.
        आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती झाली. त्‍यानंतर पहाटे ०५.१० वाजता श्रींना मंगलस्‍नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी ०६.०० वाजता संस्‍थानचे पुजारी विलास जोशी यांनी सपत्‍नीक समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. तर सकाळी ०७.३० वाजता पुजारी चंद्रकांत गोरकर यांनी सपत्‍नीक गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा केली. सकाळी १०.०० वाजता पुजारी उल्‍हास वाळुंजकर यांच्‍या काल्याच्‍या किर्तनानंतर मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री.डोंगरे यांच्‍या हस्‍ते दहिहंडी फोडण्‍यात आली. याप्रसंगी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते. त्‍यानंतर १२.३० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. सायं.०७.०० वाजता धुपारती व रात्रौ १०.३० वाजता शेजारती झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या