जळगाव - पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव जिल्हाअध्यक्ष पदी नितीन ब्राह्मणे यांची नवीन नियुक्ती


जळगाव / प्रतिनिधी :-

 दिनांक 07 / 07 / 2020 रोजी भुसावळ येथील रहिवासी असलेले पोलीस बॉईज नितीन सुरेश ब्राह्मणे यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या जळगाव जिल्हाअध्यक्ष पदी नवीन निवड करण्यात आली असल्याचे , पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक - अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी कळविले आहे.

   नितीन ब्राह्मणे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे  ( आठवले गट ) जळगाव युवा जिल्हाअध्यक्ष होते.परंतु त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन, " पोलीस बॉईज असोसिएशनच्या " माध्यमातून महाराष्ट्र पोलीस व त्यांचे कुटुंबीय यांच्या समस्या सोडवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. नितीन ब्राह्मणे यांचा जळगाव जिल्ह्यात खूप मोठा संपर्क असून, सर्व राजकीय तसेच प्रतिष्ठित लोकांसोबत चांगले संबंध आहेत.

     त्यामुळे नितीन ब्राह्मणे यांची पोलीसांसाठी तळमळ बघून पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक - अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी त्यांची जळगाव जिल्हाअध्यक्ष पदी नवीन निवड केली आहे. त्यांच्या या नवीन निवडीबद्दल..

 पोलीस बॉईज असोसिएशनचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष :- सय्यदराजा मुजावर , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष :- शैलेश पांडव,महाराष्ट्र समन्वयक :- मनोज देवकर , विदर्भ अध्यक्ष :- शाहेदभाई सय्यद, विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष :- भुवनेश्वर निमगडे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष :- गिरीश कोरामी,मुंबई सरचिटणीस :- संजय डे,  नागपूर जिल्हाध्यक्ष :- नोएल जोसेफ सर, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष :- मेजर महावीर तनपुरे, सांगली जिल्हाध्यक्ष :- विशाल सागरे , कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष :- सतीश चव्हाण, अहमदनगर जिल्हाध्यक्ष :- नौशाद शेख, परभणी जिल्हाध्यक्ष :- शरद ठाकरस , धुळे जिल्हाध्यक्ष :- बॉबी वाघ , हिंगोली जिल्हाध्यक्ष :- आकाश पाचपुते , या सर्वांनी नितीन ब्राह्मणे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या