चंद्रपूर - राष्ट्रपती पदक प्राप्त चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी सर यांचा पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने सत्कार


चंद्रपूर / प्रतिनिधी :-

पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक -   अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आदेशानुसार ..... चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आदरणीय डॉ.महेश्वर रेड्डी सर यांना भारत सरकारच्या वतीने " आंतरिक सुरक्षा सेवा पदक " तसेच " पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह व शौर्य पदक " ने गौरविण्यात आल्याबद्दल ,
 तसेच गडचिरोली जिल्ह्यात नेमणूक असताना नक्षलवाद विरोधात केलेल्या कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने डॉ.महेश्वर रेड्डी सर यांचा  सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
      यावेळी त्यांचा सत्कार करताना पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष - भुवनेश्वर निमगडे , जिल्हा संघटक - सद्दाम अन्सारी , शहर संघटक - साहिल मडावी, शहर अध्यक्ष - विवेक आत्राम , शहर उपाध्यक्ष - देविदास बोबडे , तालुका अध्यक्ष - विक्की डोंगरे , संपर्क प्रमुख - अनिल वैद्य , सहसंपर्क प्रमुख - दिलीप उरकुंदे , जिल्हा उपाध्यक्ष - राहुल वैद्य यांची उपस्थिती होती.

    प्रमोद तानाजी वाघमारे :- संस्थापक - अध्यक्ष :- पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य :- मो :- 9604972682 / 8669838008

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या