उस्मानाबाद / प्रतिनिधी :-
सन 2013 मध्ये झालेल्या अर्हता परीक्षा मधील उत्तीर्ण हवालदार हे गेल्या सात वर्षांपासून पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती मिळावी म्हणून शासनाच्या आदेशाची वाट पाहत होते. दरवर्षी त्यांची निराशा होत होती, वाट पाहून पाहून अनेक जण सेवानिवृत्त झाले , कोणी मयत झाले , तर कोणाची 1 ते 2 वर्षांची सेवा राहिली आहे.
अशा परिस्थितीत मध्ये सुदधा आता कुठे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे, कारण या सर्व उत्तीर्ण हवालदाराना लवकरात लवकर नियुक्ती आदेश देण्यात यावे , या मागणीसाठी पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे राज्य शासनाकडे सतत निवेदने दिली जात होती , मोर्चे काढले जात होते , 18 डिसेंबर 2019 मध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशनात पोलीसांच्या मागणीसाठी *पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक - अध्यक्ष प्रमोद वाघमारे* यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता व तत्कालीन गृहमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांना मागण्यांचे निवेदन दिले होते , या निवेदनामध्ये सन 2013 मधील अर्हता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती आदेश देण्यात यावे. ही मागणी सुद्धा लावून धरली होती, व शेवटी पोलीस बॉईज असोसिएशनच्या या मागणीला यश आले आहे. व 10 हजार उत्तीर्ण हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती देण्यात येणार असल्याचे गृहमंत्री यांनी सांगितले आहे.




0 टिप्पण्या