तरुणांच्या प्रसंग सावधान यामुळे खवले मांजराला दिले जीवनदान - वनविभाग, शिक्षक व तरुणांनी सोडले सुखरूप जंगलात.

                                                                                

गिरीश गोरेगावकर, प्रतिनिधी

माणगाव : दि. ९ -काही तरुणांना रस्त्याशेजारी सापडलेल्या खवले मांजराला वनविभाग शिक्षक व तरुणांच्या सहाय्याने  जंगलात सुखरूप सोडून त्या खवले मांजरास जीवन दान देण्यात आले आल्याची घटना माणगाव तालुक्यातील   मौजे विळे हद्दीत घडली.
     सविस्तर असे की मौजे विळ गावाजवळील  पेट्रोल पंपाच्या रस्त्याशेजारी एक खवले मांजर काही  तरुणांच्या नजरेस पडले. रस्त्यावरून धावणारी वाहने लक्षात घेता हे खवले मांजर गाडी खाली येण्याची भीती होती म्हणून प्रसंग सावधानता दाखवत या तरुणांनी ताबडतोब वन विभागाला कळविले. 

वनविभागाने तातडीने पावले उचलली. येलवडे येथील तरूण हर्षद शिंदे,  कल्पेश सोडकर यांनी यांनी वनवीभागाला कळवल्यानंतर काही वेळातच विळे येथील वनरक्षक अमोल नीकम व पाटनूस येथील वनपाल शंकर तांडेल तासगाव च्या वनरक्षक वर्षा व्यवहारी ताबडतोब घटनास्थळी पोहचल्या.
 स्‍स्थानिक निसर्ग  अभ्यासक राम मूंडे संदिप ऊघडा व सूभाष पवार देखील तेथे गेले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खवले मानजराची तपासणी करून व तो सुरक्षीत आहे याची खात्री  केली त्यांनतर  पंचनामा करून त्याला वनविभागातील आरक्षीत जंगलात सूखरूप सोडून देण्यात आले येलवडे, सणसवाडी व विळे येथील तरूण, शिक्षण व वन विभागाचे कर्मचारी या सर्वांमूळे या खवले मांजराला नवजीवन मीळाले.


    एका लाजाळू प्राण्यांला निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्वास  मिळाला इंडीयन पँँगोंंलिन नावाने ओळखले जाणारे  हे खवले मांजर निशाचर असून  मूंग्या,  वाळवी, कीटक व झुरळ खातात. हा निसर्गाचा  ऐक महत्वाचा घटक असून पर्यावरणाच
समतोल राखण्याचे काम तो जवाबदारीने पार पाडतो  असे स्थानिक  नीसर्ग अभ्यासक शिक्षक  राम मूंडे यांनी सांगीतले.

                              पोलीस प्रवाह न्यूज



    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या