जळगाव / प्रतिनिधी -
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील रहिवासी असलेले पोलीस बॉईज किशोरकुमार रमाकांत वाघ उर्फ मुन्ना ठाकूर यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या चोपडा तालुका अध्यक्ष पदी आज निवड करण्यात आली. मुन्ना ठाकूर यांनी सन 2016 पासून पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून चोपडा तालुक्यातील पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न शासनासमोर मांडून ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न केला आहे. चोपडा तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क असून, पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे.
त्यामुळे त्यांची ही उल्लेखनीय कामगिरी पाहता, पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक - अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी मुन्ना ठाकूर यांची चोपडा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मंगलसिंग राजपूत , जळगाव महानगर अध्यक्ष किरण राजपूत, चाळीसगाव तालुका अध्यक्ष निखिल सोनवणे, पाचोरा तालुका अध्यक्ष नदीम शेख, भुसावळ तालुका अध्यक्ष दिनेश उर्फ पिंटू परदेशी,अमित बच्छाव, यांनी अभिनंदन केले.



0 टिप्पण्या