पिंपरी चिंचवड - श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ (चिंचवडचा राजा) व श्री शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी च्या पुण्यदिवशी रक्तदान शिबीर संपन्न


प्रतिनिधी - सचिन जगताप

श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ (चिंचवडचा राजा) व श्री शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त चिंचवडगावतील विठ्ठल महादेव मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ सतत सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर राहिले आहे ते अगदी कोविड 19 काळातील अन्नदान असो किंवा निसर्ग चक्रीवादळाच्या काळातील पीडितांना मदत असो मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि चिंचवड ग्रामस्थ नेहमीच अग्रेसर असतात.
कार्यक्रमाचे आयोजक  डॉ.अविनाश वैद्य, मा.महेश मिरजकर, प्रमोद बर्डिया,दुर्गेश मिरजकर, योगेश चिंचवडे, महेश लांडगे, आदित्य मिरजकर, यश बर्डिया , ओंकार गौरीधर, शार्दुल पांढरकर,सिद्धार्थ शेलार यांनी केले. त्यांच्या याच कार्याचा पोलीस प्रवाहचे आमचे प्रतिनिधी सचिन जगताप यांनी घेतलेला आढावा घेतला



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या