*प्रतिनिधी* - *कोल्हापूर*
- *पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१६ मधील अंतिम गुणवत्ता यादीतील उर्वरित १२८५ (पात्र व पास) उमेदवारांना डायरेक्ट प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक या पदावर तात्काळ नियुक्ती आदेश देणेत यावे,,,*
*कोल्हापूर विश्राम गृह येथे मा. श्री अनिलजी देशमुख साहेब गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दि.२८/०६/२०२० रोजी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य जिल्हा कोल्हापूर यांच्यावतीने पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१६ मधील अंतिम गुणवत्ता यादीतील उर्वरित १२८५ (पात्र व पास) उमेदवारांना डायरेक्ट प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक या पदावर तात्काळ नियुक्ती आदेश देणे या विषयावर निवेदन देण्यात आले पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१६ ची ८२८जागा भरणे करीता परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात देण्यात आली होती या परीक्षेमध्ये लेखी व मैदानी परीक्षांमध्ये एकूण २९१३ उमेदवार पास झालेली गुणवत्ता यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दि.०५/०५/२०१७ रोजी जाहीर करण्यात आली होती सदर यादीतील २९१३ उमेदवारा पैकी फक्त ८२८+१५४+६३६+१० असे एकूण १६२८ उमेदवारांना धोरणात्मक निर्णयातून नोकरीत सामावून घेतले. तसेच १२८५ उमेदवारांच्या बाबत शासनांने कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. सध्या महाराष्ट्रात पोलीस उपनिरीक्षक पदाची एकूण १५१५४ पदे रिक्त आहेत. तसेच १२८५ उमेदवार हे पोलीस खात्यामध्ये १४ ते १५ वर्षाच्या आसपास सेवा निभावत आहेत. म्हणून त्यांना स्पेशल ट्रेनिंग देण्याची गरज नाही. तसेच १२८५ उमेदवारांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती केली तर हे उमेदवार किमान वेतनावर काम करणेस तयार आहेत. तरी या १२८५ या उमेदवारांची ताबडतोब पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात यावी अन्यथा पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,व गृहमंत्री, यांच्या घरा समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.श्री अनिल जी देशमुख यांना देण्यात आले.*
*यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री सतीश चव्हाण, कबनूर शहर अध्यक्ष श्री. दिलावर पटेल, शिरोळ तालुका अध्यक्ष श्री.प्रभाकर हंकारे, जनार्दन चव्हाण, तोशीम मुजावर ,संदीप चव्हाण, खंडेराव चव्हाण व इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,,,,*




0 टिप्पण्या