जळगाव - पोलीस बॉईज असोसिएशन पाचोरा तालुका अध्यक्ष पदी नदीम शेख यांची निवड


जळगाव / प्रतिनिधी -

 जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवासी असलेले पोलीस बॉईज नदीम शकील शेख यांची पोलीस बॉईज असोसिएशन पाचोरा तालुका अध्यक्ष या पदावर नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.

    नदीम शेख यांनी *मंगलसिंग राजपूत* यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील पोलीस बॉईज असोसिएशनच्या अनेक आंदोलनामध्ये सहभागी होऊन, पाचोरा तालुक्यात पोलीस बॉईज असोसिएशन वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत.तसेच ते पाचोरा तालुक्यातील पोलीसांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीला धावून जातात. त्यामुळेच पोलीसांबद्दल त्यांच्या मनात असलेली तळमळ पाहून , पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक - अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी नदीम शेख यांची पाचोरा तालुका अध्यक्ष पदी निवड करून , पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
      या निवडीबद्दल नदीम शेख यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या मित्रपरिवारातील सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या