चिंचवड :- (प्रतिनिधी) ज्योती मोडे
कोरोनाचे सावट पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस गडद होत आहे.याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन विविध योजना राबवित आहे.संसर्ग रोखण्यासाठी आपण शहरात दहा दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे.कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय योग्य आहे.
आपण 19 जुलै पासून लॉक डाऊन काही अंशतः शिथील करणार आहोत.यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश असणार आहे.
याच पार्श्वभूमीवर येत्या 3 ऑगस्ट रोजी घराघरात साजरा होणारा रक्षाबंधन सणानिमित्त लागणाऱ्या राखी विक्रीला 19 जुलै पासून परवानगी द्यावी व दुकाने उघडी ठेवण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा.अशी मागणी करण्यात आली आहे.
उत्सव जीवनात आनंद वाढवत असतात हे निर्विवाद सत्य आहे.या राखी व्यवसायात वर्षभर हाजारो हात कार्यरत असतात. व अनेक कुटुंब यावर अवलंबुन असतात.शहरात अनेक गरजू महिला व अंध-अपंग बांधवांना या व्यवसायातुन वर्षभर रोजगार मिळत आहे.राखीचे उत्पादन हे हस्तकलेतून करण्यात येते.या व्यवसायात अद्यापही कोणत्याही प्रकारचे मशीन काम करीत नाही.
वर्षभर मेहनत करून या राख्या आपल्या उद्योगनगरीत बनविल्या जात आहेत.येथील राख्या या राज्यभर पाठविल्या जातात.सुमारे चार ते पाच हजार व्यापारी, कामगार,गरजू महिला,अंध-अपंग व्यक्ती या व्यवसायावर अवलंबून आहेत.कोरोनाचे संकट असले तरीही नात्यांची वीण घट्ट करणारी ही राखी घेण्यासाठी अनेक ग्राहक (महिला) बाजार पेठेत जाणार आहेत.24 जुलै रोजी लॉक डाऊन संपताच राखी खरेदी साठी अनेक व्यावसायिक घाऊक व्यवसायिकांकडे खरेदीसाठी जाणार आहेत.व ग्राहकांची पावले सुद्धा बाजारपेठेत वळणार आहेत.यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढू शकते.राखी पाठविण्यासाठी पोस्ट व कुरियर सेवा मिळावी या साठी ग्राहक धावपळ करतील.जर पिंपरी-चिंचवड शहरात 19 जुलै पासून राखी विक्री च्या व्यवसायाला परवानगी दिल्यास सर्व नियमांचे पालन करून व्यावसायिक ग्राहकांना योग्य सेवा देऊ शकतील.व ग्राहकांना राखी खरेदीसाठी पुरेसा वेळ सुद्धा मिळेल.यासाठी दुकानाची वेळ वाढून दिल्यास गर्दी होणार नाही.
शहरातील सर्व राखी निर्माते,कामगार व विक्रेते यांच्या वतीने आम्ही आपणांस विनंती करीत आहोत की आमच्या मागणीचा सहानभूती पूर्वक विचार करावा.वर्षभर तयार झालेल्या राख्या जर विक्री झाल्या नाही तर पुढील काही महिन्यात उत्पादन बंद ठेवावे लागेल. यामुळे हजारो जण वर्षभरासाठी बेरोजगार होतील.या सर्व गोष्टींचा विचार करून आपण 19 जुलै पासून पिंपरी-चिंचवड शहरात राखी विक्रीच्या दुकानांना परवानगी द्यावी अशी विनंती
राखी उत्पादक सीमा कुंकुलोळ,
श्री महावीर राखी (आस्था) यांनी केली आहे

0 टिप्पण्या