प्रतिनिधी चंद्रपूर :-
दिनांक 06 / 06 / 2020 रोजी .. पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक - अध्यक्ष श्री. प्रमोद तानाजी वाघमारे सर यांच्या आदेशानुसार चंद्रपूर येथे गृहमंत्री श्री. अनिल देशमुख सर यांना " पोलीस बॉईज असोसिएशन शाखा चंद्रपूर जिल्हा यांच्या वतीने " महाराष्ट्र पोलीसांच्या " विविध मागण्यांचे निवेदन विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री.भुवनेश्वर
निमगडे ..
यांच्या नेतृत्वाखाली सद्दाम अन्सारी .. देविदास बोबडे .. साहिल मढावी या शिष्टमंडळाने दिले.
👇👇
1 ) जोपर्यंत कोरोना बंदोबस्त आहे ..तोपर्यंत पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना दुप्पट पगार देण्यात यावा.
2 ) प्रत्येक जिल्ह्यात तेथील पोलीसांची संख्या पाहून स्वतंत्र हॉस्पिटलची व अंबुलन्सची व्यवस्था करून दर आठवड्याला पोलीसांची कोरोनाची तपासणी करावी.
3 ) पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी हे सेवानिवृत्त होऊन मरण पावले असता ..महात्मा फुले जीवनदायिनी आरोग्य योजनेअंतर्गत पोलीस कुटूंब आरोग्य योजनेचा लाभ शेवटपर्यंत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मिळावा.
4 ) राखीव पोलीस उपनिरीक्षक 2014 मधील सर्व उमेदवारांना पदोन्नती देऊन ..RSI - RPI - तसेच R - DYSP यांच्या जागा तात्काळ भरण्यात याव्या.
5 ) 2013 मधील विभागीय मर्यादित उपनिरीक्षक परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना त्वरित नियुक्ती देण्यात यावी.
6 ) 2016 मधील पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षेतील पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती आदेश द्यावे.
7 ) पोलीस पाल्यांना पोलीस भरतीमध्ये 10 % आरक्षण देण्यात यावे.
====================
🙏एक विनंती :-- 🙏 महाराष्ट्र पोलीस अधिकारी / पोलीस कर्मचारी यांनी त्यांच्या समस्या आम्हाला डायरेक्ट फोन करून कळवाव्यात.🙏 शक्य होईल तेवढ्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू
====================
प्रमोद तानाजी वाघमारे :- संस्थापक :- अध्यक्ष :- पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य :- मोबाईल :- 9604972682 .. 🙏
पोलीस प्रवाह न्युज संपर्क - 9850358005




0 टिप्पण्या