निसर्ग चक्रीवाऱ्याचे माणगांवात तांडव; अपरिमीत नुकसान जनता हतबल.

रविंद्र कुवेसकर, प्रतिनिधी

*निसर्ग चक्रिवादळाने तालुक्यात अपरिमीत नुकसान सगळ्यांचेच पंचनामे करा, जनता हतबल*

 माणगांव, दि. ७ - कोरोना विषाणूचा गेले तीन महिने आरोग्यावर आणि आता निसर्ग चक्रिवादळाचा माणसाच्या निवाऱ्यावर हमला जनजीवन उद्ध्वस्त, हतबल,भयभीत भविष्य अंधकारमय. चक्रिवादळ आधी श्रीवर्धनला येणार असे भाकित बदलून मग अलिबागला धडकणार. अशी फक्त बारा तास आधी आयत्यावेळी शासन सूचना देण्यात आली. ३ जूनला दूपारी ०२ .०० वाजता येणारे वादळ त्या आधीच हजर झाले. अनपेक्षितपणे जणु काही केंद्रबिंदू माणगांवच असल्याप्रमाणे ताशी १२० किमी. च्या वेगाने फिरणाऱ्या वादळाचा जबरदस्त तडाखा तालुक्यात बसला. भयावह घोंगावणाऱ्या वायुचे तांडव सकाळी अकरा वाजल्या पासूनच सुरु झाले. हे तांडव साधारण दूपारी तीन चारच्या दरम्यान जवळपास चारतासा पेक्षा जास्त उच्छाद मांडून भयान शांततेत थंडावले. तेही आपल्या भयंकर खाणाखुणा सोडून. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. जगाशी संपर्क तुटला साऱ्या यंत्रणा ठप्प. कर्फ्यू संचारबंदी आदेशाची काही गरजच उरली नाही. सगळीच जनता भितीने होम क्वारंटाईन झाली होती.

घराची दार खिडक्या एका झटक्यात बंद झाली. घराबाहेर डोकावून बघण्याचीही भिती वाटत होती. सगळ्या घर अंगणात नुसता हिरवा पालापाचोळा, काटक्या कौल पत्र्यांच्या उडून आलेल्या तुकड्यांचा ढीग भयावह घोंगावणारा आवाज आणि पाऊस, मोडलेली उन्मळलेली लहान मोठी झाडे. उखडलेले वीजेचे पोल, काही लोकांच्या घरांवरील, मोठ मोठ्या इमारतींवरील शेडचे पत्रे लोखंडी फ्रेमसह, शाळा दुकानांवरील तसेच उतेखोल गांवच्या गिरीजन वाडी शाळेवरील तसेच पोलीसलाईन पोलीस स्टेशनचे इमारती वरील संपूर्ण पत्रे उडाले. काही रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या झाडांच्या फांद्या पडून रस्ते बंद झाले. जवळपास चौदा डीपी अनेक वीजेचे पोल, तारा कोसळल्या पडल्यात. महावितरणची मेन लाईन सुरु करणेस जवळपास पंधरा दिवसाहून अधिक दिवस लागतील त्यामुळे इतर सर्वच व्यवस्थांवर परिणाम होईल. पाणीपूरवठा ठप्प झाला तोही चालू करणेस अनेक दिवस लागतील.  प्रचंड मोठे नुकसान आणि घोंगावणाऱ्या वाऱ्याचे रौद्ररुप पाहून अनेकांच्या जीवाचा थरकाप उडाला. कोरोना कोरोना करणाऱ्या प्रत्येकाला आता निसर्ग निसर्ग चक्रिवादळाने असा काही तडाखा दिला आहे; यातून सावरणे फारच कठीण होणार आहे. तालुक्यातील नागरिकांची अवस्था अत्यंत कठिण झाली आहे.



अनेक जेष्ठ नागरिक तसेच आजची पिढी यांनी आजवर असे कधीच आक्रित पाहीले नाही. ५० वर्षाहून अधिक काळ पूर्वीचा वीर यशवंतराव घाडगेंचा पुतळा देखील या चक्रिवादळात पडला पोलीस कचेरीचे फार मोठे नुकसान झाले आहे. निसर्ग कोपला आहे. निसर्गापूढे कोणाचही काही चालू शकत नाही कसलीही पथक लावा कसलेही नियोजन करा आपात्कालीन योजना आणा एका झटक्यात होत्याचे नव्हते करण्याची ताकद या वादळात होती. एनडीआरएफ तैनात करुनही उपयोग होणार नाही असे वादळ, उभ्या हयातीत आपण असे वादळ अनुभवले नाही मग हे जवानही माणसच आहेत. तेही हतबल होतील असे वादळ. संपूर्ण थरार संपल्यानंतर आता पंचनामे करण्या पलिकडे आता आपल्या हाती काही उरले नाही. आर्थिक कणा कोरोनाने आधीच मोडला आहे. आता कोणा कोणाला मदत करणार सगळ्यांचेच प्रचंड नुकसान झाले आहे. नगरपंचायत प्रशासनाचे वतीने रस्त्यावरील झाडे हटविण्याचे काम सुरु झाले आहे. संपूर्ण माणगांव तालुक्यात अपरिमीत हाणी झाली आहे. पिण्याच्या पाण्याची काही दिवसात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. सगळेच आपआपली घरे सावरण्यात गुंतले आहेत.
                                       


सगळ्या यंत्रणा तोकड्या पडतील वादळ झाल्या रात्री अंधारात एकाकी पडलेले जनजीवन पाहता किती तंत्रशास्त्र प्रगत असू द्यात निसर्गापूढे सारेच हतबल झालेत. पाऊस कितीही पडू द्यात पण असा थरार कधिच आपल्या माणसानी अनुभवला नाही. आता यातून सारे जनजीवन रुळावर यायला एक महिना जाईल परंतु माणसांच्या मनात भयानक अनुभवाच्या खाणाखूणा सोडून निसर्ग वादळाचे तांडव शमले जरी असले पुन्हा रात्रीत किंवा पुढील दिवसात येणार तर नाही ना या बद्दल मनात शंका व्यक्त होत आहे. लोक खरंच एकमेकाशी बोलताना भिती व्यक्त करीत आहेत. माणगांवकरांचे अतोनात नुकसान झाले आहे यासर्वांचे पंचनामे व्हावेत अशी येथील सर्वांचीच मागणी आहे पण ही भरपाई मिळे पर्यंत पदरमोड करावीच लागणार आहे. कोरोना संकटात रोजगार बुडाला उत्पन्नाचे साधन उरले नाही अशातच हा तडाखा सहन करावा लागतोय माहीत नाही भविष्यात काय वाढून ठेवले आहे अशी भिती नागरिक व्यक्त करीत आहेत पावसाळी पूर्व जीवनावश्यक वस्तुंची खरेदी केली खर्च केला पण चक्रिवादळाने सारा वाया गेला.

                       पोलीस प्रवाह न्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या