वसई - लायन्स क्लब आणि सा. समाज मन च्या माध्यमातून अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप !



प्रतिनिधी - वसई :

 देशासह राज्यात टाळेबंदी हळु हळू शिथिल होत अाहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जेवढी काळजी टाळेबंदीच्या काळात घेतली गेली त्यापेक्षा दुप्पटीने काळजी अनलाँक १ च्या काळात घेण्याची नितांत गरज लक्षात घेवून लायन्स क्लब वसई यांच्या सहकार्याने विरार पुर्व , फुलपाडा येथील विकास नगरी येथे कार्यक्रमाचे आयोजन सा. समाज मन च्या सहसंपादिक  व समाजसेविका सौ. पुर्वा साळवी यांनी केले .
सदर कार्यक्रमात लायन्स क्लब चे माजी गर्वनर , राष्ट्रीय सैनिक संस्था ( महाराष्ट्र) चे संयोजक  लायन्स श्री. प्रशांत पाटील यांनी अनलाँक -१ च्या काळात नागरिकांनी कश्याप्रकारे काळजी घेवून कोरोनावर मात करायची या बाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी नागरिकांनी घरच्या घरी स्वत:ची आणि आपल्या परिवाराच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या या बाबत माहिती दिली.
सदर प्रसंगी अर्सेनिक अल्बम ३०  या गोळ्यांचे वाटप विकास नगरी येथील २०० कुटूंबांना करण्यात आले. डाँ. अनिरूध्द चव्हाण यांनी सदर गोळ्यांची विस्तृत माहिती  दिली.  तसेच या गोळ्या घेताना पाळावयाची पथ्ये या बाबत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना लिलाधर तळले यांनी केली. सदर कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. कविता फड व त्यांचे चिरंजीव निखिल फड आणि अोमकार सावंत यांनी विषेश मेहनत घेतली. उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार श्री. अतुल साळवी यांनी मानले .
 अर्सेनिक अल्बम ३०  या गोळ्यांचे विनामुल्य वाटप केल्या बद्दल लायन्स क्लबचे श्री. प्रशांत पाटिल , डाँ अनिरूध्द चव्हाण , लिलाधर तळले, सा. समाज मन च्या सहसंपादिक सौ. पुर्वा साळवी आणि अतुल साळवी यांचे विकास नगरी येथील नागरिकांनी विषेश आभार मानले.
            पोलीस प्रवाह न्युज संपर्क - 9850358005

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या