जळगाव / प्रतिनिधी -
दिनांक 29 / 06 / 2020 - पाचोरा येथील रहिवासी असलेले पोलीस बॉईज मंगलसिंग राजपूत यांनी आत्तापर्यंत केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून त्यांची पोलीस बॉईज असोसिएशनचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याचे , पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक - अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी सांगितले आहे.
सन 2016 पासून मंगलसिंग राजपूत हे पोलीस बॉईज असोसिएशनचे पाचोरा तालुका अध्यक्ष या पदावर काम करत होते. त्यांनी आत्तापर्यंत जळगाव जिल्हा पोलीस अधिकारी / पोलीस कर्मचारी / व त्यांचे कुटुंबीय यांच्या अडचनीसाठी विविध आंदोलने केली आहेत, निवेदने दिली आहेत, तसेच पोलीसांच्या प्रत्येक समस्या त्यांनी शासनासमोर मांडल्या आहेत.
मंगलसिंग राजपूत यांचे संपूर्ण बालपण जळगाव पोलीस लाईनमध्ये गेले असल्यामुळे जळगाव पोलीस दलामध्ये त्यांची ओळख आहे. जळगाव जिल्ह्यातील राजकीय पक्षातील व सामाजिक संघटनेतील बऱ्याच लोकांमध्ये त्यांचा खूप मोठा जनसंपर्क असल्याने मंगलसिंग यांची वेगळीच ओळख निर्माण आहे.
त्यामुळे त्यांची ही कारकीर्द पाहून त्यांना बढती देऊन एक प्रकारे त्यांचा सन्मान केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक - अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी , मंगलसिंग राजपूत यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून ,
पोलीस बॉईज असोसिएशनचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सय्यदराजा मुजावर.
शाहेदभाई सय्यद ( विदर्भ अध्यक्ष )
भुवनेश्वर निमगडे ( विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ) शैलेश पांडव ( महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ) मनोज देवकर ( मुख्य समन्वयक महाराष्ट्र राज्य )
डॅनियल जोसेफ सर ( नागपूर शहर जिल्हाध्यक्ष )
गिरीश कोरामी ( गडचिरोली जिल्हाध्यक्ष )
संदीप घाटे ( अकोला जिल्हा उपाध्यक्ष )
नौशाद शेख ( अहमदनगर जिल्हाध्यक्ष )
विशाल सागरे ( सांगली जिल्हाध्यक्ष ) सतीश चव्हाण ( कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष ) बॉबी वाघ ( धुळे जिल्हाध्यक्ष ) राकेश कांबळे ( जळगाव जिल्हाध्यक्ष ) शरद ठाकरस ( परभणी जिल्हाध्यक्ष ) महेश पाचपुते ( हिंगोली जिल्हाध्यक्ष ) यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.



0 टिप्पण्या