आपत्तीतही लुट; आभाळ फाटलयं कुठ कुठ ठिगळ लावणार अशी अवस्था.

रविंद्र कुवेसकर, प्रतिनिधी

 माणगांव, दि.७ - निसर्ग चक्रिवादळाने माणगांव तालुक्यातील एकही घर असे शिल्लक राहीले नाही, ज्याचे नुकसान झाले नाही. एकामागून एक महाभयंकर संकट कोसळली आहेत. अशावेळी आपल्याला कोणी येईल मदत देईल याची उरली सुरली अपेक्षाही धुसर होत चालली आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी कमीतकमी पंधरा ते वीस दिवस जातील, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. पिण्याचे पाणी पूरवठ्यावरही मोठा परिणाम झाला असून नगरपंचायतने तीन दिवसात जनरेटरची व्यवस्था उपलब्ध करुन पाणी पूरवठा सुरु केला; परंतु पाणी एकदीवस आड मिळणार आहे. पुढील आठदिवस पाणी पूरवठा होणार नाही या भितीने  बाजारात मिनरलर वाटर बिसलरी बाॅटल, जार यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांनी पाण्याचा साठा करुन ठेवण्यासाठी क्रेट च्या क्रेट चढ्या किंमतीने खरेदी केले. काही अपप्रवृत्तीनी ही संधी समजून नफेखोरी केली. वीज नसल्याने साध्या मेणबत्त्याही ८ रुपये एक तर दूसरे दिवशी १२ रुपये एक असे दररोज चढ्या भावाने विकत असल्याच्या तक्रारी नागरीक सांगत आहेत.

माणगांव तालुक्यात हजारो सिमेंटच्यापत्र्यांचा चकाचूर झाला, तितकीच कौलेही उडाली आहेत. तेवढी आता नव्याने लागतील. त्यांचा तुटवडा पडला असून गरजवंत गोरगरीब लोकांच्या मजबुरीचा फायदा काही व्यापारी घेत असल्याचे अनुभव लोक बोलून दाखवित आहेत. शासनाने साठेबाज आणि वाढीव भाव घेणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. आठ फुटी सिमेंट पत्रे ७००- ८०० रूपये भाव तसेच दहा फुटी पत्रे रुपये १००० च्यावर भाव सांगितले जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. एकतर कोरोना संकट लाॅकडाऊन मध्ये लोकांचा रोजगार बुडाला आहे, पैसेची कमतरता आहे. आता चक्रीवादळा मुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घरावर पडलेली झाडे कापण्यासाठी हजारो रुपये मजुरी आणणार कुठुन ? मोडतोड डागडुजी साठी माणस मिळेनाशी झालीत. काहींच्या घरातील अन्नधान्य जीवनावश्यक मालाचे नुकसानही झाले आहे.

जरूरी मालाच्या कमतरते मुळे मनमानी भाववाढ झाली आहे. तालुक्यात कोणाचेही नियंत्रण लक्ष उरले नाही. भाजीपाल्यासह सर्वच वस्तुंचे वाढलेले दर, वाटेल ते भाव घेणारी भ्रष्टव्यापारी प्रवृत्ती, अशा संकटसमयी आपत्तीत माणुसकिला काळीमा फासणारी आहे. या प्रवृत्तींना लगाम कोण घालणार ? असा गर्भगळीत सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनीधीही मुगगिळून गप्प बसलेत, आता लोकशाहिच्या चौथ्यास्तंभाने याला वाचा फोडावी अस लोक बोलताहेत. ही वेळ कोणावर आरोप प्रत्यारोपाची, साक्षीपूराव्याची नसून या संकटसमयी या प्रवृत्ती रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. अस सुज्ञ नागरिकांमधून बोलल जात आहे. लाॅकडाऊन मध्ये सर्व शक्तिमान शासनानेच लक्ष वेधावे तालुक्यातील प्रांत, तहसीलदार यांनी या विरुद्ध कडक कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे.

                    पोलीस प्रवाह न्यूज.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या