प्रतिनिधी - गणेश कडू, लोणावळा
करोना आपत्तिच्या अनुशंगाने सरकारने लोकडाउन घोषित केल्याने अचानक सर्व व्यवहार ठप्प झाले,अनेक लोकांचे रोजगार बंद झाले , गोरगरीबांना अन्नाचे दोन घास सुद्दा मिळायला मुश्कील झाले ,लोनावळा शहरांमध्ये रोडवरील राहणारे बेघर,भीकारी,मजूर , मनोरुग्ण , हातावर पोट असनारी अनेक कुटुंबे यांच्या पुढं पोटाची खळगी भरण्यासाठी कोणताच पर्याय शिल्लक न राहिल्याने त्यांच्यावर उपाशी झोपन्याची वेळ आली असताना मंडळाचे सर्व सेवेकरी यांनी श्वीस्वामी समर्थ प्रकट दीनाचा कार्यक्रम रद्द करून ,जमा झालेल्या वर्गनीमधुन अन्नदान सेवा करण्याचं ठरवीले व त्या प्रमाणे श्री स्वामी समर्थ , श्री शंकर महाराज व श्री शंकरचीले महाराज यांच्या कृपार्शिवादाने मंडळाने २४ मार्च २०२० रोजी पासुन अन्नयज्ञ सुरू केला.
लोणावळा शहरांमध्ये कोणीही रात्री उपाशी पोटी झोपणार नाही ही मनाशी खुनगाठ बांधुन सर्व सेवेकऱ्यानी स्वतःला या अन्नयज्ञ या कार्यात झोकून देऊन कार्य चालु केले
व ६८ दिवस न थकता अविरत चालू आहे ,रोज रात्री सरासरी दोनशे लोकांचे जेवणं हे मंडळ पुरवत होते या अन्न्दानामधे मंडळाणे आठवड्यातुन पाच दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक खीचडी व दोन दीवस पोळी भाजी , अशा प्रकारे दर्जेदार रुचकर व स्वच्छ अन्न् पुरवले आहे ,या कार्यात महीला भगिनींचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे.आता लोकडाऊन शितल झाल्यामुळे मंडळ सेवा तुर्तास थांबवत आहे.मंडलच्या कार्यकत्यानी त्या सर्व लोकांचे आभार मानले ज्यांनी विविध प्रकारे मदत करून या कार्यास मंडळास मदत केली.






0 टिप्पण्या