माणगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांचा धावता दौरा माणगावकर भ्रमनिरास.


अरुण पवार, प्रतिनिधी

    माणगांव- दि ९- माणगांव तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे माणगांव येथे मंगळवार दि. ९ जून रोजी ११.३० वा. महाड अर्बन बँके समोर हजर झाले. त्यावेळी आपत्तग्रस्त नागरिकांनी आपल्या व्यथा मांडण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्यावेळी माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांनी माणगांवकरांच्या व्यथा मांडल्या. यावेळी खा. सुनील तटकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, आ. भरत गोगावले, नगराध्यक्षा योगीता चव्हाण, माणगांव तालुका रा. कॉ. अध्यक्ष सुभाष केकाणे, नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
   
     शरद पवार हे माणगांव शहरात आल्यानंतर माणगांवकरातर्फे निसर्ग चक्रीवादळात अतोनात नुकसान झालेल्या नागरिकांच्या व गावकारांच्या समस्या मांडल्या. माणगांव शहरात गेले ८ दिवस वीज व पाणी नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विजेचे खांब तुटल्याने वीज पुरवठा गेले ८ दिवस बंद आहे. त्यामुळे पाणी पुरवठा बंद होता. मात्र जनरेटर लावून तो तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेला आहे. अनेकांच्या घराचे पत्रे, कौले उडून अतोनात नुकसान झाले आहे. या वादळात छपर उडाल्याने लोकांच्या घरातील अन्नधान्याची नासाडी झाली आहे. या वादळातील आपतग्रस्तना तातडीने मदत मिळावी व माणगाव तालुक्यातील वीज पुरवठा त्वरित सुरू करावा अशा प्रकारच्या अनेक समस्या व मागण्या माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांनी मांडल्या.

     यानंतर शरद पवार यांनी उभे राहूनच बोलताना सांगितले की, या सर्व समस्या व मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण होतील. काळजी नको मी सर्व पाहून घेतो असे आश्वासन दिले. ते केवळ ३ मिनिटेच थांबून पुढील दौऱ्यासाठी मार्गस्थ झाले. मात्र शरद पवार यांनी नुकसानग्रस्तांची पाहणी न केल्याने अनेक व्यापारी व नागरिक नाराज झाले. आपल्या समस्या ऐकून घेतील आणि नुकसानीची पाहणी करतील अशी अपेक्षा व उत्सुकता लागून राहिली होती. परंतु, ते पाहणी न करताच पुढील दौऱ्यावर निघून गेले. त्यामुळे आलेल्या लोकांचा भ्रमनिरास झाला. माणगांव तालुक्यात सर्वच गावातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये तब्बल १८७ गावांचा समावेश आहे. तर उर्वरित गावांचे कमी जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनाम्याचे काम सुरू आहे. ८ दिवस वीज नसल्याने नागरिक व ग्रामस्थ अतिशय हवालदिल व संतप्त झालेले आहेत. माणगांव तालुक्याला चार आमदार असूनही चक्री वादळात सापडलेल्या कोणत्याही प्रकारचा नुकसान भरपाईचा प्रत्यक्ष दिलासा मिळालेला नाही. खेडेगावात कोणीही पाहणी करण्यास आलेल नाही. त्यामुळे सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, मंत्री आमदार यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. माणगांव तालुक्याला स्व. माजी आ. अशोकदादा साबळे यांच्या नंतर कोणीच वाळी राहिलेला नाही असे अनेक नागरिकांनी बोलून दाखविले.

                       पोलीस प्रवाह न्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या