कोरोनाविरूध्दच्या लढाईत गोरेगांवचे सरपंच आक्रमक.

 
गिरीश गोरेगावकर, प्रतिनिधी

गोरेगांव - दि २७ -कोरोनाचा प्रदूभर्ज्ञव सतत वाढत आहे. परिसरातील सर्व गावांमध्ये कोरोनाने पुन्हा डपाके वर काढले आहे. मात्र कोरोनाचा शिरकाव गोरेगांवमध्ये होवू नये म्हणून गोरेगांवचे सरपंच जुबेर अब्बासी यांच्यासह सर्व ग्रमपंचायत सदस्य आणि ग्रमपंचायत प्रशासन आक्रमक  झाले आहे. काल शनिवारी सरपंच श्री. अब्बासी यांनी ग्रमपंचायत प्रशासनासह रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी नाकेबंदी करून  सर्व प्रकारच्या वाहनांना बाजारपेठ प्रवेशबंदी केली.

कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. त्यातच स्थानिकांनाही याची लागण होवू लागल्याने चक्रीवादळापासून  कोरोनाविरोधातील थंडावलेली मोहिम ग्रमपंचायतीने पुन्हा सुरू  केली आहे. गोरेगांव आणि आजुबाजुच्या परिसरात वाढत चाललेला कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, गोरेगांवमध्ये बाहेरगावाहून जे कोणी येतील त्यांनी आपली माहिती ग्रमपंचायत प्रशासनाला देण्याचे आवाहन ग्रमपंचायतीने केले आहे. अशी माहिती देण्यास कोणी टाळाटाळ  केल्यास त्याचे सर्व कुटुंब क्वारंटाईन करण्यात येईल. तसेच परगांवी कोणाला जायचे झाल्यास ग्रमपंचायतीची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय ग्रमपंचायतीने घेतला आहे.

त्याचप्रमाणे काल शनिवारी ग्रमपंचायत प्रशासनाने रस्त्यावर उतरून नाकेबंदी करित, ज्यांनी मास्क लावला नसेल, अशा नागरिकांकडून दंड वसुल करित होते. तर बाजारपेठेतील वाहनांची अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी बाजारपेठेत वाहने नेण्यास बंदी घालण्यात आली होती. सरपंच श्री. अब्बासी यांनी घेतलेल्या या भूमिकेचे सर्वसामान्य ग्रमस्थांमधून स्वागत होत आहे.

                            पोलीस प्रवाह न्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या