प्रतिनिधी, गिरीश गोरेगावकर
माणगाव : दि २८ - माणगाव तालुक्यातील मौजे देवळीं येथील दोन घरांनवरील छप्पर निसर्ग वादळात उडुन गेल्याचे कळताच हजवाने फांऊडेशन काही तासातच दोन घराचे छप्पर करितां पत्रे उपलब्ध करून या दोन कुटुंबीयाना आधार दिल्याची घटना काल दि. 27/6/20 रोजी घडली.
सविस्तर असे की हजवाने फाउंडेशन ने श्रीवर्धन , म्हसळा व माणगाव तालुक्यात झालेल्या वादळात अनेक गोरगरिबाचे घरांची नुकसान झालेल्या शेकडो कुटुंबीयांना अनेक प्रकारे मदतीचा हात देऊन त्याचे कुटुंब सावरण्याचा प्रयत्न केला आहें. यातील एक भाग म्हणजे मौजे देवळीं येथील गरीब कुटुंबातील दोन घराचे छप्पर नसल्याचे सरपंचा सौ. भोजने यांनी हजवाने फांऊडेशन ला सांगितले आसता, काही तासातच या दोन घरांना लागणारे पत्रे हजवाने फाउंडेशन ने त्याना घरपोच दिल्याने येथील ग्रामस्थांनी संस्थेविषयी समाधान व्यक्त करीत ग्रामपंचायतीने आभार व्यक्त केले.
या हजवाने फांऊडेशन चे चेयरमन बशीर हजवाने यांनी श्रीवर्धन , म्हसळा व माणगाव तालुक्यात अनेक घरांना आधार दिले आहें. माणगाव तालुक्यात वनीं, पूरार , मांजरोने,नांदवी व टेंमपाले या गावात देखील या फांऊडेशन मार्फत अनेक कुटुंबीयांना पत्रे , कौले , ढापे , कोणे उपलब्ध करून मदतीचा हात दिला आहें. तसेच जनरेटर उपलब्ध करून काही गावात पाणी पोहचण्याचे काम , पिण्याचे पाणी , मेणबत्ती तर काही ठिकाणी घर दुरुस्ती करीता रोखरक्कम देण्याचे काम देखील या फाऊंडेशन मार्फत करण्यात आले आहें.
या अशा अनेक प्रकारे गरजू व गरीब लोकांना मदत करणारी हि हजवाने फाऊंडेशन हि, हजवाने फाउंडेशन एकच निर्धार गरिबांचा वेळोवेळी चा आधार या ब्रीदवाक्यने काम करीत असलेली पहावयास मिळत आहें.
पोलीस प्रवाह न्यूज




0 टिप्पण्या