प्रतिनिधी - चिंचवड
डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी द्वारा लॉकडाऊन काळापासून (व्यायाम प्रकार) चॅलेंज राबवित आहेत याचा उद्देश लॉकडाऊन काळात सर्वांनी फिट राहायला पाहिजे हाच होता.
आपणास माहीतच आहे शासन आदेशानुसार सर्व प्रशिक्षण केंद्र, शाळा, जिम हे व्यायाम करण्याचे पर्याय बंद आहेत. हे लक्षात घेऊन आम्ही मुलांची मार्शल आर्ट व खेळाची आवड कायम राहण्यासाठी, कोरोना या विषाणूच्या लढाईसाठी मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती गरजेची आहे. व त्यासाठी व्यायाम हाच पर्याय आहे. हे लक्षात घेऊन लॉकडाउन काळातील व्यायाम हे उद्दिष्ट्य समोर ठेवले. व डी. एस. ए. चॅलेंज सुरु केले त्यात दररोज एक नवीन व्यायाम प्रकार दिला जातो मुलांनी तो व्यायाम प्रकार सांगितल्या प्रमाणे करायचा त्याचे विडिओ फेसबुक आणि डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी ग्रुप पोस्ट करायचा. शासन प्रशिक्षण केंद्र चालू करण्याचे आदेश देत नाही तोपर्यंत चॅलेंज चालू ठेवणार आहे प्रशिक्षण केंद्र चालू केले की चॅलेंज बंद करणार आणि चॅलेंज ज्यांनी रेग्युलर आणि सांगितल्या पद्धतीने केले अश्या मुलांना आम्ही *डी. एस. ए. चॅलेंजर* म्हणून सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मान करणार आहोत.
*आम्हाला आनंद आहे की आज ह्या उपक्रमाची 100 दिवस पूर्ण झाले आहेत*
सदर उपक्रम आम्ही सोशल ग्रुप वर पोस्ट केला जातो त्याद्वारे बरेच मुले, मुली, महिला व पालकहि हे चॅलेंज करत आहेत आणि विडिओ पाठवत आहेत. *विशेष बाब म्हणजे फेसबुक माध्यमातून सदर चॅलेंज उपक्रम राज्यातच नाही तर भारताच्या बाहेर (अमेरिका) येथे पण करत आहेत. व त्याचे विडिओ आम्हाला व फेसबुक वर पोस्ट करत आहेत. याशिवाय डी. एस. ए. चॅलेंज ची दाखल आकाशवाणी ने देखील घेतली आहे.*
आज आम्हाला आनंद होत आहे की सर्वांनी व्यायाम करावा व तंदुरुस्त राहावे याकरिता आम्ही जो उपक्रम सुरु केला होता त्यात 4 वर्षांपासून ते 70 वयोगटातील व्यायाम प्रेमी सहभागी झाले आहेत. या उपक्रमाने चॅलेंज करणाऱ्या प्रत्येकाने समाजाला दाखवून दिल आहे की कोणताही व्यायाम आवडीने केला की त्यात फिटनेस व वेगळाच आनंद मिळतो.
डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमीच्या उपक्रमास समाजातील सर्व स्थरातून उस्फुर्त सहभाग लाभत आहे याचा आम्हांला अभिमान आहे.
सदर उपक्रमास विशेष सहकार्य अकॅडेमीचे वरिष्ठ प्रशिक्षक राकेश यादव, हिमाली वहालकर, अमेय पिसाळ व प्रशिक्षक लेखा लोखंडे, श्रुती सुर्वे यांचे लाभले आहे.
तसेच अकॅडेमी च्या सचिव शीतल मोरे यांनीही सर्व पालक विध्यार्थी व चॅलेंज करणाऱ्या सर्व क्रीडा प्रेमींना चॅलेंजचे शंभर दिवस पूर्ण झाल्यामुळे शुभेच्छा दिल्या आहेत.
डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी तर्फे सर्व सहभागी, प्रशिक्षक, विद्यार्थी व पालक यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐
धन्यवाद.
अरविंद मोरे
संचालक - डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी
पोलीस प्रवाह न्युज संपर्क - 9850358005




0 टिप्पण्या