चक्रिवादळ व मोठ्या पावसाचा धोका असल्याने नागरिकांनी ४८ तास सतर्क राहावे : तहसिलदार प्रियंका आयरे

  
रविंद्र कुवेसकर, प्रतिनिधी

 माणगाव: दि. २ - प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनांनुसार "निसर्ग" वादळ अरबी समुद्रातून वेगाने पुढे येत असल्याने कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर  रायगड जिल्ह्यात खबरदारी म्हणून दि. ३ जून पहाटे २ वाजे पासून ते पुढील ४८ तास कलम १४४ अंतर्गत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे, जिल्ह्यात सागरी चक्रिवादळ येणार आहे. तासाला १०० ते १२० कि. मी. प्रती वेगाने वारे वाहतील हे वादळ श्रीवर्धन किनार पट्टीला आदळणार असल्याने लगतच्या सर्व तालुक्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. आपल्या इकडे फार मोठ्याप्रमाणात पाऊस पडण्याचा धोका असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे.

संचारबंदी दरम्यान नागरिकांनी आपल्या घरातच सुरक्षित रहावे. शासनातर्फे वेळोवेळी सूचना मिळतील, तोवर सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहन शासनाच्या वतिने करण्यात आले असल्याची माहीती तहसिलदार प्रियंका आयरे यांनी पत्रकारां सोबत घेतलेल्या सभेत दिली आहे.
कोव्हिड संसर्ग रोखण्यासाठी ज्याप्रमाणे सर्वांनी सहकार्य केले त्याच प्रमाणे या चक्रिवादळाला तोंड देण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे ही मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी यासाठी वरील विषया संदर्भात आज तहसीलदार माणगांव यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने सर्व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक झाली त्यात असे सांगण्यात आले आहे की उद्या ३ जून २०२० रोजी पूर्ण रायगड जिल्हा बंद राहील. तसेच माणगांव मधील सर्व दुकाने बंद राहतील. आज दि. २ मंगळवार ५ वाजल्या पासून दि. ४ परवा सकाळ पर्यंत कोणीही बाहेर येऊ नये. वादळामुळे लाइट, पाणी तसेच काही अत्यावश्यक गोष्टी बाधित होऊ शकतात. म्हणून त्याची आज पासूनच काळजी घ्यावी.

सरकारी सूचनांचे पालन करावे. व्यापारी, पोलीस, महावितरण, महसूल आपत्ती व्यवस्थापण नगरपंचायत प्रशासन तसेच संबधित सर्वच लोकांशी चर्चा विनीमय करुन महत्वाच्या सूचना केल्या आहेत. मच्छिमार बांधवांनी देखील समुद्रात मासेमारीसाठी जावू नये. समुद्र किनार पट्टीवरील व कच्च्या घरात स्थायिक असलेल्या नागरिकांनी गावात सुरक्षितस्थळी आपल्या परिवारासह गुरा-ढोरांनाही सोबत घेऊन जावे, त्यांना एकटे सोडू नये. गावातील नागरिकांनी सुध्दा त्यांना सहकार्य करणे अपेक्षित असल्याची माहीती देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना सोबत दोन हात करीत असतानाच हे वादळाचे संकट उभे राहिले आहे. आपण सर्व एकत्रित पणे संयम आणि धैर्याने सामोरे जाऊ. प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावे सतर्क राहावे अशी माहीती त्यांनी दिली आहे.


                                    पोलीस प्रवाह न्यूज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या