परेश शिंदे,प्रतिनिधी
माणगाव :दि १९ - कोरोना महामारीचे संकट डोक्यावर असताना निसर्ग चक्रिवादळामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवर सगळेजण कोणतेही मतभेद न ठेवता आपापल्या परीने यातुन सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. आदरणीय खासदार माननीय सुनिलजी तटकरे साहेब, पालकमंत्री मा ना आदितीताई तटकरे, आमदार मा अनिकेतभाई तटकरे हे पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक गावात जाऊन लोकांना धिर देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
रस्ते सुद्धा मोकळे झाले नव्हते अशा परिस्थितीत साहेब, मा.ना.ताई आणि आमदार अनिकेतभाई संपर्क साधून प्रशासनाला माहीती देऊन भिषण परिस्थितीत सहकार्याची भुमिका बजावत होते. रस्ते मोकळे करणे, अन्नधान्य पुरवणे, पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे त्यासाठी जनरेटर उपलब्ध करून देणे, राॅकेल उपलब्ध करून देणे यासाठी पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक गावात जाऊन संपर्क साधत होते. प्रांताधिकारी, तहसीलदार, बि.डि.ओ. यांच्या सोबत समन्वय साधून लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त बांधवांना त्वरीत मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न केला आणि त्याला यश ही आले. आज केवळ १२ व्या दिवशी नुकसानग्रस्त बांधवांना मदत मिळण्यास सुरवात झाली. याआधी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली परंतु शासकीय मदत मिळण्यास दोन दोन तीन तीन महिने कालावधी गेला परंतु महाविकास आघाडी सरकार ने केवळ १२ दिवसात नुकसानग्रस्त बांधवांना मदत मिळवून दिली. आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ दळवी हे सुध्दा आमदार मा अनिकेतभाई तटकरे व पालकमंत्री मा.ना.आदितीताई तटकरे यांच्या सोबत नुकसानग्रस्त बांधवांना मदतीचा धनादेश देताना आपण पाहीलं आहे.
मग स्थानिक प्रतिनिधींना विश्वासात न घेता तटकरे कुटुंबिय मदत देत आहेत हा आरोप अनिल नवगणे यांचा कितपत योग्य आहे याचा विचार त्यांनीच करावा. खरं तर खासदार सुनिलजी तटकरे साहेब, पालकमंत्री मा ना आदितीताई तटकरे, आमदार अनिकेतभाई तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ दळवी हे सगळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त बांधवांना मदतीचा धनादेश देताना आपण पाहत आहोत यामध्ये अनिल नवगणे मात्र कुठे दिसले नाहीत. आज १२ व्या दिवशी जनतेला नुकसान भरपाई मिळत आहे अस असताना अनिल नवगणे मानसिकत संतुलन बिघडले सारखे बोलत आहेत.
राहीला प्रश्न माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील विज पुरवठा सुरळीत होण्याचा. मग माझं अनिल नवगणे यांना खुले आव्हान आहे कि हिम्मत असेल तर याच उत्तर त्यांनीच द्याव. त्यांची सामाजिक बांधिलकी काहीच नाही का ? त्यांना लोकां मध्ये जायला कोणी आडकाठी केली होती का ? काहीही न करता फक्त आरोप करायचे याला जनता जनार्दन कदापि भिक घालणार नाही. मागच्या सरकारचे निकष बदलायला लावुन जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी खासदार सुनिलजी तटकरे साहेब,पालकमंत्री मा ना आदितीताई तटकरे, आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी पाठपुरावा केला आणि आज ती मदत नुकसानग्रस्त बांधवांना मिळत असेल तर अनिल नवगणे यांना पोटदुखी होण्याच कारण काय. मग गलिच्छ राजकारण कोण करतंय. निष्क्रिय कोण आहे.
आमदार भरतशेठ गोगावले हे माणगाव तालुक्यात नुकसानग्रस्त बांधवांना मदतीचा धनादेश देताना आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या सोबत उपस्थित होते त्यामध्ये अनिल नवगणे कुठे दिसले नाहीत. याची माहिती तरी अनिल नवगणे यांना होती का ? या सगळ्या गोष्टीचा विपरीत परिणाम अनिल नवगणे यांच्या वर झाला आहे आणि ते वायफळ बडबड करीत आहेत असे तर नाही ना ? नैसर्गिक आपत्ती मुळे जिवीतहानी झाल्यास त्याची तात्काळ कार्यवाही करावी तसे शासनाचेच निकष आहेत त्यात सुध्दा खालच्या पातळीवर जाऊन अनिल नवगणे बोलत आहेत.आज प्रशासनातील प्रत्येक अधिकारी मग ते प्रांताधिकारी असतील, तहसीलदार, बि.डी.ओ., वनविभागाचे अधिकारी, मत्स्यविभागाचे अधिकारी असतील, महावितरण चे अधिकारी असतील या सगळ्यांच्या सोबत तटकरे कुटुंबिय समन्वय साधत जनतेला दिलासा देण्याचा काम करीत आहेत. खरं तर आज भिषण परिस्थिती आहे जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे गरजेचे असताना अनिल नवगणे राजकारण करीत आहेत.
सामाजिक बांधीलकी जपण्याची वेळ असताना सामाजिक भान विसरून अनिल नवगणे सारखी माणसं जर अशा प्रकारची वायफळ बडबडत करीत असतील अशा परिस्थितीत अनिल नवगणे गलिच्छ राजकारण करीत असतील तर खरंच अनिल नवगणे यांच मानसिक संतुलन बिघडले आहे. जनतेला तात्काळ मिळालेली मदत यातुन त्यांना दिलासा मिळत असुन जनतेने या बद्दल समाधान सुध्दा व्यक्त केले आहे. मग अनिल नवगणे असे असमाधानी असल्या सारखे का वागत आहेत.
पोलीस प्रवाह न्यूज

0 टिप्पण्या