प्रतिनिधी गिरीश गोरेगावकर
गोरेगांव : दि १७ - गेल्या तीन महिन्यांपासून राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्याचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य सरकारने जारी केलेल्या सुचनांची अंमलबजावणी गोरेगांवमध्ये करित असतानाच ३ जून रोजी आलेल्या चक्रीवादळामुळे कोरानाविषयक जनजागृती करण्याचे काम काही दिवस थंडावले होते, मात्र आता सर्व काही पूर्वपदावर येत असताना ही मोहिम अधिक तीव्र करणार असल्याचे सरपंच जुबेर अब्बासी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
यावेळी बोलताना श्री. अब्बासी यांनी कोरोनाचा काम सुरू असतानाच शहरातील पावसाळयापूर्वीची नालेसफाई १०० टक्के पूर्ण तर केलीच, पण रस्त्यावरील मोठमोठ्या झाडांचे फांद्या छाटण्याचे काम केल्याने या चक्रीवादळांचा फटका काही प्रमाणात कमी झाला असल्याचे सांगून, चक्रीवादळानंतर दोनच दिवसात नागरिकांना पंपावर जनरोटर्स लावून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सध्या चाकरमानी मोठ्या संख्येने गोरेगांव आणि आसपासच्या गावांमध्ये आलेले आहेत. त्यात काही बाधित रूग्ण आढळत असल्याने त्याचा संसर्ग स्थानिकांना होवू नये यासाठी पुन्हा शहरातील शासनाच्या सर्व नियमांचे पालन करित बाजारपेठेतील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी जाजागृती करणार असल्याचे देखील ते म्हणाले.
कोरोनाच्या काळात ग्रमपंचायतीच्या मार्फत गोरेगांवसह चिंचवली ग्रमपंचायत हद्दीत दर आठवड्याला सँनिटायझरेशन केले जात होते. आता या नैसर्गिक आपत्तीनंतर पुन्हा ते सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगून, ग्रहक आणि व्यापारी यांना घालून दिलेले नियम पाळले जात आहेत की, नाही हे देखील पाहिले जाणार असल्याचे ते म्हणाले. नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांना भेटी देत, पंचनामे करण्याचे काम महसूल विभाग, जिल्हा परिषदेचा शिक्षक वर्ग आणि ग्रमपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण केल्याचेही ते म्हणाले.
पोलीस प्रवाह न्यूज

0 टिप्पण्या