उस्मानाबाद / प्रतिनिधी :-
कोरोनासारख्या जीवघेण्या काळातही महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून दिवस रात्र रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. अक्षरशः दिवस रात्र ड्युटी करून यांना पुरेशी झोप मिळत नाही , की आराम मिळत नाही , यामुळे पोलीसांचे आरोग्य बिघडत आहे, तरीही ते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.
आणि अशा या भयानक परिस्थिती मध्ये राज्य सरकारने पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर जुलै महिन्यात परीक्षेचे ओझे टाकून त्यांची झोपच उडवून दिली आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेऊन पात्र झालेले पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी असतात अशा पोलीस अधिकाऱ्यांची 2 वर्षाच्या आत परीक्षा घेणे बंधनकारक असते, परंतु गेल्या 7 ते 8 वर्षात यांची परीक्षा घेतली गेली नाही. यामध्ये या अधिकाऱ्यांचा काहीही दोष नाही. जवळ जवळ हे सर्व अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत असून यामधील काही जणांना उत्कृष्ट कार्याबद्दल पारितोषिके सुद्धा मिळाली आहेत.
5 एप्रिल 1966 च्या शासनाच्या एका परिपत्रकात मुद्दा क्रमांक 06 व 08 मध्ये असेही म्हटले आहे की, अशा परीक्षा घेणे बंधनकारक किंवा गरजेचे नाही, जर त्या अधिकाऱ्याची कोठेही नेमणूक नसेल किंवा तो कार्यरत नसेल तरच त्याची परीक्षा घ्या. आणि जर त्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली असेल तर , त्यांची परीक्षा घेऊ नका.
सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत जर शासनाने ह्या परीक्षा घेतल्या तर, त्या अधिकाऱ्यांवर विपरीत परिणाम होऊन त्यांची मानसिक परिस्थिती बिघडू शकते. कारण सध्या हे 185 अधिकारी कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थितीतिचा मुकाबला करण्यासाठी दिवस रात्र रस्त्यावर उभे आहेत. आणि जर शासनाला यांची परीक्षाच घ्यायची असेल तर , मात्र या सर्व पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना अभ्यास करण्यासाठी कमीत कमी 01 वर्षाचा तरी वेळ देणे आवश्यक आहे.त्यामुळे शक्यतो शासनाने या परीक्षा घेऊ नये.व त्यांची आहे त्याच पदावर नेमणूक असू द्यावी.
त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी याची गंभीरपणे दखल घेऊन पुढच्या महिन्यात होणाऱ्या परीक्षा रद्द कराव्यात , व 185 पोलीस उपअधीक्षक यांचे होणारे नुकसान थांबवावे. अन्यथा या कोरोनाच्याही परिस्थिती मध्ये पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या घरासमोर आंदोलन केले जाईल , अन्यथा निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी.
आपला विश्वासू
प्रमोद तानाजी वाघमारे
संस्थापक - अध्यक्ष
पोलीस बॉईज असोसिएशन
महाराष्ट्र राज्य.
मो :- 9604972682
पोलीस प्रवाह न्युज संपर्क - 9850358005




0 टिप्पण्या