सोशल डिस्टन्स ठेऊन कुडो मार्शल आर्ट व वैयक्तिक खेळाचे ट्रैनिंग चालू करण्यास शासनाने संमती द्यावी हि विनंती🥋🥋...- अरविंद मोरे ( अध्यक्ष - पिंपरी चिंचवड कुडो असोसिएशन व विश्वविक्रम वीर)


प्रतिनिधी - पिंपरी चिंचवड

सध्य स्थिती लक्षात घेता या साथीच्या रोगावर नियंत्रण राखायचे असेल तर  सोशल डिस्टन्स पाळणे हे महत्वाचे आहेच त्याबरोबर स्वतः ची काळजी स्वतः घेणे हाच उपाय आहे.  स्वतःची काळजी हि फक्त बाहेरून घेऊन चालणार नाही,  शरीराच्या आतून हि घेणे हे त्यापेक्षाहि जास्त महत्वाचे आहे. या रोगाला प्रतिबंध घालायचा असेल तर मार्शल आर्ट सुरुवात करणे गरजेचे आहे. कारण मार्शल आर्ट मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढणारच हे नक्की. सध्या सर्व खेळाडू सरावापासून वंचित आहेत. आणि त्यामुळे खेळाडूंचे मानसिक व शारीरिक स्वास्थ बिघडतं चालले आहे.  कारण खेळाडू  खेळला नाही तर तो संपून जाईल.

*मार्शल आर्ट व काही वैयक्तिक खेळ असे आहेत जे सोशल डिस्टन्स पाळून खेळता येतात. जिथं एकमेकांचे साहित्य वापरावे लागत नाही, एकच साहित्य अनेक जण वापरत नाहीत असे खेळ.*

मार्शल आर्ट किंवा वैयक्तिक क्रीडा प्रकारात स्पर्धा हा भाग सोडला तर एकमेकांना स्पर्श न करता सराव करता येतो. आणि त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढतेच सोबत स्वतः वर विश्वास आणि स्वतः चे रक्षण हा सर्वात महत्वाचा भागही पूर्ण होतो.

मी अरविंद मोरे (आंतराष्ट्रीय खेळाडू व विश्वविक्रमवीर) आहे सध्या मला जो त्रास होत आहे तो इतर खेळाडूंना नक्कीच होत असेल. आम्ही सध्य स्थिती समजू शकतो. आणि त्याप्रमाणे नियम पाळून प्रशिक्षण देऊ शकतो. तरी शासनाने या क्रीडा प्रकारांना सुरु करण्यास परवानगी द्यावी. ही विनंती.

आणखीन एक महत्वाचे आज संपूर्ण महाराष्ट्रात कुडो मार्शल आर्ट व यासारखे क्लास चालू आहेत या कलेवर पोट भरणारे खेळाडू, प्रशिक्षक आहेत त्यांना पण सध्या जगावं कसे हा प्रश्न नक्कीच पडला असणार?

तरी सोशल डिस्टन्स व शासनाने दिलेली नियमावली पाळून मार्शल आर्ट या क्रीडा प्रकार सुरु करण्यासाठी शासनाने लवकर आदेश काढावेत हि शासनास विनंती.

अरविंद मोरे
(अध्यक्ष - पिंपरी चिंचवड कुडो असोसिएशन व विश्वविक्रम वीर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या